“लवकरच मोठा राजकीय भूकंप” : गिरीश महाजनांचा दाव्याने CM शिंदे अन् ‘काँग्रेस’ टेन्शनमध्ये!
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : “कोणत्या पक्षात काय घडतं हे आपल्याला कळेल. पण निवडणुकीच्या आधी म्हणजेच 15 ते 20 दिवसांत मोठे राजकीय भूकंप झालेले पहायला मिळतील,” असा मोठा दावा भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने राजकीय विश्वात चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या या दाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निकालासोबत आणि काँग्रेस (Congress) पक्षात होणाऱ्या कथित फुटीशी जोडले जात आहे. ( Congress party will split in the state after Girish Mahajan’s claim.)
राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या चर्चांनुसार, येत्या 10 तारखेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कधीही तो निकाल जाहीर करणार आहेत. मात्र हा निकाल काय लागेल याची वाट न बघताच भाजपने त्यांचा प्लॅन बी चालू केला आहे. निकाल मुख्यमंत्री शिंदेंच्या विरोधात लागला तर काँग्रेसचे काही आमदार येत्या 10-15 दिवसांमध्ये भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
Aditya-L1 Mission : इस्त्रोनं रचला नवा इतिहास! आदित्य एल-1 ने गाठलं आपलं लक्ष्य
राज्यात मागील दोन वर्षांमध्ये दोन मोठे राजकीय भूकंप झाले. आता तिसरा राजकीय भूकंप काँग्रेस पक्षाच्या रुपाने पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे. गतवर्षी अजित पवार यांच्या सहभागावेळीच काँग्रेस आमदारांचा एक गटही भाजपात येणार अशी चिन्ह होती. पण काही कारणास्तव हा प्रवेश रखडला होता. पाच राज्याच्या निवडणूक निकालांनंतर निर्णय घेणार असे काहींनी भाजप श्रेष्ठींना कळवले होते. आता लोकसभेच्या तोंडावर हे प्रवेश होण्याची शक्यता आहे.
‘हिंगोली’च्या बैठकीत राडा! खासदार पाटील अन् मंत्री सत्तार यांच्यात खडाजंगी; वादाचं कारण काय?
प्रवेशाचे मूळ कारण काय?
काही बड्या काँग्रेसच्या नेत्यांच्या मेडिकल कॉलेजच्या अॅडमिशन कोटा कमी करण्यात आला होता. या कारवाईचा मोठा फटका आमदारांना बसला होता. या निर्णयामुळे अनेक मेडिकल कॉलेजच्या प्रत्येकी 70 पेक्षा अधिक सीट कमी झाल्या होत्या. या सर्व जागा एक वर्षांनी पूर्ववत करण्यात आल्या. त्याच वेळी हे सर्व आमदार भाजपात प्रवेश करणार अशी शंका उपस्थित करब्यात आली होती. पण हा प्रवेश होऊ शकला नाही. आता पुन्हा या आमदारांच्या प्रवेशाची चर्चा सुरु झाली आहे. प्रवेश करणाऱ्यांमध्ये धुळे, जळगाव, वाशिम, लातूर, सांगली, कोल्हापूर आणि नागपूर जिल्ह्यातील आमदारांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. एका मोठ्या नेत्याच्या नेतृत्वाखाली हे सर्व आमदार भाजपात जातील अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.