Ram Mandir Donation theft : ‘आरोपींची केस लढणार नाही’, अयोध्येच्या वकीलांचा मोठा निर्णय…

अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरी प्रकरणातील आरोपींची केस लढणार नसल्याचा निर्णय बार असोसिएशनने घेतल्याचं समोर आलंय.

Ram mandir

Ram mandir

Ram Mandir Donation theft : राम मंदिर देणगी चोरी (Ram Mandir Donation theft) प्रकरणी आरोपींविरोधात अयोध्येतील वकिलांनी आरोपींचे खटले कुणीच चालवायचे नसल्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आलीयं. उत्तर प्रदेशातील फैजाबाद बार असोसिएशनकडून ठराव करण्यात आला आहे. अयोध्या बार असोसिएशनचे अध्यक्ष कालिका प्रसाद मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली वकिलांची बैठक पार पडली असून या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

राम मंदिर चोरी प्रकरणी आरोपींविरोधात अयोध्येतील वकिलांनी आरोपींचे खटले कुणीच चालवायचे नसल्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आलीयं. फैजाबादमध्ये पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलायं. उत्तर प्रदेशातील फैजाबाद बार असोसिएशनकडून ठराव करण्यात आल्याची माहिती अयोध्या बार असोसिएशनचे अध्यक्ष कालिका प्रसाद मिश्रा यांनी दिलीयं.

अयोध्येच्या फैजाबादमध्ये कालिका प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली वकीलांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. बार असोसिएशनच्या या निर्णयावर कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी पोस्ट शेअर करीत आपली भूमिका मांडलीयं. वकिलांनी घेतलेला निर्णय बेकायदेशीर असून असंवैधिानिक आहे. कोणत्याही आरोपीला स्वत:ची बाजू मांडण्याचा अधिकार आहे. वकील आरोपींच्यावतीने लढणार नसतील तर वकील देणे ही न्यायालयाची जबाबदारी असल्याचं असीम सरोदे यांनी स्पष्ट केलंय. तसेच जगात सर्वच ठिकाणी न्यायतत्व पाळतात. अयोध्येतील वकिलांना मुर्खपणा करु नये, असंही सरोदे म्हणाले आहेत.

दरम्यान, अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात 8 आरोपींना अटक करण्यात आली असून या आरोपींच्या घरातून रोकड जप्त करण्यात आली आहे. कधीकाळी अर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबाचे अचानक दिवस बदलल्याने एसआयटीचा आरोपींवर चांगलाच संशय बळावला. अर्थिक अडचणीत असलेले आरोपी आता लग्जरी घरासह फार्म हाऊस आणि महागड्या गाड्य वापरत होते, असं पोलिसांच्या तपासात समोर आलंय.

Exit mobile version