Ram Mandir : अयोध्येत आज (Ram Mandir) होणारा रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही मिनिटांवर येऊन ठेपला आहे. या सोहळ्यासाठी अयोध्येसह संपूर्ण देश सज्ज झाला आहे. देशभरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळत असून ठिकठीकाणी विवध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. त्यात महाराष्ट्रासाठी (Maharashtra) एक अभिमानाची बाब आहे. ती म्हणजे महाराष्ट्रातील मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळे हे मुख्य पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित कोण आहेत? जाणून घेऊ…
मोदींनी कधीच श्रीरामांच्या तत्वांचं आचरण केलं नाही; भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींचा घरचा आहेर
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचा आणि रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त जवळ आला आहे. प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त सुमारे 84 सेकंदाचा आहे. तर या पुजेचे मुख्य पुजारी काशीचे अभ्यासक लक्ष्मीकांत दीक्षित असणार आहे. रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेवेळी लक्ष्मीकांत दीक्षित यांच्यासह 5 जण गर्भगृहात उपस्थित राहणार आहेत.
जय श्री राम..! मुकेश अंबानींचे ‘अँटिलिया’ प्राणप्रतिष्ठा साेहळ्यासाठी सजले, पाहा फोटो
लक्ष्मीकांत दीक्षित हे मूळचे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील आहेत. मात्र त्यांचे कुटुंब अनेक पिढ्यांपासून काशीमध्ये वास्तव्यास आहेत. लक्ष्मीकांत दीक्षित हे मीरघाट, वाराणसी येथील सांगवेद महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक आहेत. काशीच्या राजाच्या मदतीने सांगवेद महाविद्यालयाची स्थापना झाली. पंडित लक्ष्मीकांत हे काशीतील यजुर्वेदाच्या उत्तम अभ्यासकांमध्ये गणले जातात. पूजेच्या पद्धतीतही त्यांनी प्रभुत्व मिळवले आहे.
China Landslide : चीनमध्ये भीषण दुर्घटना भूस्खलनामुळे 47 हून अधिक लोक ढिगार्याखाली अडकले
लक्ष्मीकांत यांचे पूर्वज प्रसिद्ध पंडित गागाभट्ट हे होते. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला होता. त्याचबरोबर त्यांच्या पूर्वजांनी नागपूर आणि नाशिक या ठिकाणी देखील पौरोहित्य केलेलम आहे. लक्ष्मीकांत यांनी त्यांचे काका गणेश दीक्षित यांच्याकडून वेद आणि अनुष्ठानांची दीक्षा घेतली आहे. सध्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 121 पंडितांची टीम 16 जानेवारीपासून अनुष्ठान करत आहे तसेच यामध्ये 40 हून अधिक विद्वान देखील सहभागी आहेत.