Ratan Tata Death News : प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) यांचे काल (बुधवार) वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने देशभरात शोककळा पसरली. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला. यावेळी त्यांचे खास श्वानही त्यांना निरोप देण्यासाठी पोहोचले आहेत.
विकास काम केली, मात्र उद्घाटनाचा घाट कधी घातला नाही…; तनपुरेंचा विरोधकांना खोचक टोला
रतन टाटांना अखेरचा निरोप द्यायला लाडका ‘गोवा’ला पाहताच अनेकांचे डोळे पाणावले#RatanTataPassedAway #RatanTata #Goa pic.twitter.com/Lwajec6h4b
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) October 10, 2024
मागील गेल्या काही दिवसांपासून रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक होती. प्रकृती खालावल्याने त्यांना दोन दिवसांपूर्वी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, काल उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, आज वरळीतील स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी रतन टाटा यांच्या पार्थिवाचे अनेक नेत्यांनी अंत्यदर्शन घेतले.
रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या लाडक्या ‘गोवा’नेही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. ‘गोवा’ नावाचा हा कुत्रा रतन टाटांच्या अगदी जवळचा होता. टाटांना तो काही वर्षांपूर्वी गोवा राज्यात सापडला होता. त्यानंतर त्याचे नाव ‘गोवा’ ठेवण्यात आले. हा कुत्रा रतन टाटा यांच्यासोबत बॉम्बे हाऊसमध्ये राहत होता. आणि त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला होता. रतन टाटा यांचे पार्थिव पाहिल्यानंतर गोवा देखील उदास दिसत होता.
Manoj Bajpayee: मनोज बाजपेयींचा ‘भैय्या जी’ या चित्रपटाचा सोनी मॅक्सवर भव्य प्रीमिअर
दरम्यान, रतन टाटा यांचे व्यावसायिक जीवन जितके प्रेरणादायी होते, तितकेच त्यांचे वैयक्तिक जीवनातील प्राण्यांवरील प्रेम अनन्यसाधारण होते. ‘गोवा’ त्यांच्या हृदयाच्या अगदी जवळ होता आणि टाटांनी प्राण्यांबद्दल नेहमीच संवेदनशीलता दाखवली.
काही वर्षांपूर्वी रतन टाटांनी कुत्र्यांसाठी अत्याधुनिक हॉस्पिटल सुरू केले. नवी मुंबईतील हे 5 मजली हॉस्पिटलमध्ये एकाचवेळी 200 पाळीव प्राण्यांवर उपचार केले जाऊ शकतात. हे रुग्णालय बांधण्यासाठी 165 कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात येते.