Download App

RBI ची मोठी कारवाई, ‘या’ 3 मोठ्या बँकांवर ठोठावला लाखोंचा दंड

RBI Fines On Bank : देशाची सर्वात मोठी बँक आरबीआयने (RBI) पुन्हा एकदा तीन मोठ्या बँकांवर कारवाई केली आहे. या तिन्ही बँकांवर आरबीआयने

  • Written By: Last Updated:

RBI Fines On Bank : देशाची सर्वात मोठी बँक आरबीआयने (RBI) पुन्हा एकदा तीन मोठ्या बँकांवर कारवाई केली आहे. या तिन्ही बँकांवर आरबीआयने लाखोंचा दंड ठोठावला आहे. याबाबत आरबीआयने माहिती दिली आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, नियामक अनुपालनातील काही त्रुटींसाठी कोटक महिंद्रा बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि पंजाब नॅशनल बँकेला दंड ठोठावला आहे.

‘बँक क्रेडिट डिलिव्हरीसाठी क्रेडिट सिस्टमवरील मार्गदर्शक तत्त्वे’ आणि ‘कर्ज आणि ऍडव्हान्स रक्कम – वैधानिक आणि इतर निर्बंध’ यावरील काही निर्देशांचे पालन न केल्याबद्दल देशाची सर्वात मोठी बँक आरबीआयने कोटक महिंद्रा बँकेला (Kotak Mahindra Bank) 61.4 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर ‘नो युवर कस्टमर (केवायसी)’ च्या काही सूचनांचे पालन न केल्याबद्दल आयडीएफसी फर्स्ट बँकेला (IDFC First Bank) 38.6 लाख रुपयांचा दंड आरबीआयने ठोठावला आहे. याच बरोबर ‘बँकांमधील ग्राहक सेवा’ या संदर्भात रिझर्व्ह बँकेने दिलेल्या काही निर्देशांचे पालन न केल्याबद्दल पंजाब नॅशनल बँकेला (Punjab National Bank) 29.6 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असल्याची माहिती एका निवेदनात दिली आहे.

कायदेशीर लढाईत रोख व्यवहारांवर ठेवले जाणार लक्ष, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश 

तर दुसरीकडे दंड नियामक अनुपालनातील त्रुटींवर आधारित असल्याने याचा कोणताही परिणाम ग्राहकांवर होणार नाही. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी आरबीआयने बँकिंग नियमन कायद्यातील तरतुदींचं उल्लंघन झालं आहे आणि ‘ठेवीवरील व्याज दर’, ‘केवायसी’ आणि ‘कृषी कर्ज प्रवाह’ संबंधित काही सूचनांचं पालन न केल्याने ॲक्सिस बँकेला 1.91 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता आणि युको बँकेला 2.68 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.

‘फुले’ चित्रपट अन् नवीन वादाला सुरुवात, अनुराग कश्यप यांचा थेट ब्राह्मण संघटनांवर हल्लाबोल 

follow us