20 Rupees New Notes : देशाची सर्वात मोठी बँक आरबीआयने (RBI) नवीन 20 रुपयांच्या नोटा जारी करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. याबाबत आरबीआयने एक निवेदन जारी करत माहिती दिली आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, नवीन 20 रुपयांच्या नोटा महात्मा गांधी (नवीन) मालिकेचा भाग असतील आणि त्यावर गव्हर्नर संजय मल्होत्रा (Sanjay Malhotra) यांची स्वाक्षरी असेल.
आरबीआयनुसार, 20 रुपयांच्या नवीन नोटांची रचना महात्मा गांधी (नवीन) मालिकेतील 20 रुपयांच्या नोटांसारखीच असेल. आरबीआयने पूर्वी जारी केलेल्या सर्व 20 रुपयांच्या नोटा कायदेशीर चलन म्हणून कायम राहतील. याचा अर्थ असा की जुन्या 20 रुपयांच्या नोटा पूर्वीप्रमाणेच वैध राहतील. त्यांच्या वापरावर कोणत्याही प्रकारचे बंधन नाही अशी माहिती आरबीआयने दिली आहे.
Issue of ₹20 Denomination Banknotes in Mahatma Gandhi (New) Series bearing the signature of Shri Sanjay Malhotra, Governorhttps://t.co/aIsF0mXwqo
— ReserveBankOfIndia (@RBI) May 17, 2025
उपकार मोजायचे नसतात तर…, राऊतांच्या कार्यक्रमात ठाकरेंची फटकेबाजी
आरबीआयच्या वरिष्ठ नेतृत्वात बदल झाल्यानंतर नवीन गव्हर्नरच्या स्वाक्षरीसह नवीन नोटा जारी करण्याची प्रक्रिया ही एक मानक प्रक्रिया आहे आणि त्याचा विद्यमान चलनाच्या उपयुक्ततेवर किंवा मूल्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
… म्हणून संजय राऊतांना अटक, ‘नरकातला स्वर्ग’ प्रकाशन सोहळ्यात शरद पवार स्पष्टच बोलले