नवरा एका अन् बायको दुसऱ्या कोपऱ्यात? विमानातील हा ‘तमाशा’ आता कायमचा बंद! वाचा नवे नियम

Flight New Booking Rule फ्लाईट लेट झाली, कॅन्सल झाली किंवा अचानक वेळ बदलली की विमान कंपन्या हात वर करायच्या आणि प्रवाशांना वाऱ्यावर सोडायच्या

नवरा एका अन् बायको दुसऱ्या कोपऱ्यात? विमानातील हा 'तमाशा' आता कायमचा बंद! वाचा नवे नियम

नवरा एका अन् बायको दुसऱ्या कोपऱ्यात? विमानातील हा 'तमाशा' आता कायमचा बंद! वाचा नवे नियम

Flight ticket new rules 60 percent seats free dgca guidelines : काय राव, विमानाचं तिकीट काढूनही स्वतःच्याच सीटसाठी पदरचे जास्तीचे पैसे मोजायचे? आणि कहर म्हणजे, फॅमिलीसोबत तिकीट बुक करूनही नवरा विमानाच्या एका टोकाला आणि बायको दुसऱ्या कोपऱ्यात? विमानातील हा ‘सीटचा तमाशा’ आता कायमचा बंद होणार आहे. कारण नागरी उड्डान मंत्रालयाने एअरलाईन्स कंपन्यांच्या मनमानीला जोरदार दणका’ देत 60 टक्के सीट्स प्रवाशांना मोफत देण्याचे निर्देश दिले आहेत. पण नक्की नियम काय बदललेत? तुमचे पैसे आता कसे वाचणार? जाणून घेऊया या विशेष रिपोर्टमध्ये…

Ali Larijani : ‘टॉफी’ देणाऱ्यांना झुकवणारा लारिजानी ठार; ‘रणनीतीकारा’ च्या मृत्युने इराणचा गेम ओव्हर?

60 टक्के सीट्स आता अगदी मोफत असणार

आतापर्यंत काय व्हायचं? तिकीट काढल्यानंतरही मनासारखी सीट हवी असेल, तर एअरलाईन्स ‘विंडो सीट’ किंवा ‘एक्स्ट्रा लेगरूम’च्या नावाखाली अवाढव्य पैसे उकळायच्या. पण सरकारच्या या निर्णयामुळे प्रवाशांची ही लूट थांबणार असून, खऱ्या अर्थाने प्रवाशांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. आता तुमचं तिकीट म्हणजे तुमची हक्काची मोफत सीट असणार आहे. सर्वात मोठा दिलासा म्हणजे, आता प्रत्येक फ्लाईटमध्ये किमान 60 टक्के सीट्स कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय म्हणजेच बिल्कुल फ्री उपलब्ध करून देणं विमान कंपन्यांना बंधनकारक असणार आहे.

फॅमिली सोबतच बसणार!

बदललेल्या नियमात नुसतं 60 टक्के सीट्स फ्री देऊन सरकार थांबलेलं नाही, तर दुसरा सर्वात मोठा दणका दिलाय तो फॅमिली मेंबर्सना वेगळं बसवणाऱ्या एअरलाईन्सना नव्या नियमानुसार, जर तुम्ही एकाच PNR वर म्हणजे एकाच वेळी कुटुंबाचं किंवा मित्रांचं तिकीट बुक केलं असेल, तर एअरलाईन्सला तुम्हाला शेजारी-शेजारीच सीट द्यावी लागेल. आतापर्यंत काय व्हायचं? एकाच तिकीटावर बुकिंग असूनही जाणीवपूर्वक नवरा एका कोपऱ्यात आणि बायको दुसऱ्या कोपऱ्यात असायची, हे फक्त पैसे उकळण्यासाठी. पण आता तसं चालणार नाही. एकाच ग्रुपमधील प्रवाशांना एकत्र बसवणं ही आता एअरलाईन्सची जबाबदारी असेल. यामुळे प्रवासादरम्यान होणारी तुमची चिडचिड आणि गैरसोय आता कायमची मिटणार आहे. Flight ticket new rules 60 percent seats free dgca guidelines

फ्लाईट लेट झाली तर काय?

फ्लाईट लेट झाली, कॅन्सल झाली किंवा अचानक वेळ बदलली की विमान कंपन्या हात वर करायच्या आणि प्रवाशांना वाऱ्यावर सोडायच्या हे आतापर्यंत व्हायचं. पण मित्रांनो, आता एअरलाईन्सची ही ‘दादागिरी’ चालणार नाहीये. कारण नव्या नियमांनुसार, जर तुम्हाला बोर्डिंग नाकारलं किंवा विमानाला उशीर झाला, तर तुमच्या हक्कांची अंमलबजावणी करणं आता कंपन्यांना अनिवार्य असणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व नियम आता एअरलाईन्सला त्यांच्या वेबसाईटवर, मोबाईल ॲपवर आणि विमानतळावर प्रादेशिक भाषेत, म्हणजेच आपल्या मायबोली भाषेत स्पष्टपणे लावावे लागणार आहे. त्यामुळे आता इंग्रजी समजत नाही म्हणून तुमच्या होणाऱ्या फसवणुकीला ब्रेक लागणार असून, तुमचे हक्क आता तुमच्या भाषेत तुम्हाला समजणार आहेत.

पुरूषार्थच श्रेष्ठ अन् पत्नी आज्ञाधारीच हवी; अहवालात जेन झीचे धक्कादायक विचार समोर

पाळीव प्राणी आणि सामानाचे नियम

सरकारने नुसतं माणसांचंच नाही, तर तुमच्या लाडक्या पाळीव प्राण्यांच्या (Pets) प्रवासाचं टेन्शनही आता मिटवलंय. आतापर्यंत कुत्र्या-मांजरांना विमानात न्यायचं असेल, तर एअरलाईन्सचे नियम इतके गुंतागुंतीचे असायचे की, प्रवाशांना काहीच कळायचं नाही. पण आता एअरलाईन्सला पाळीव प्राण्यांच्या वाहतुकीबाबत स्पष्ट आणि पारदर्शक मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यास सांगण्यात आलयं. एवढंच नाही, तर जर तुम्ही खेळाडू असाल किंवा संगीतकार असाल आणि तुम्हाला तुमचं जड क्रीडा साहित्य (Sports Kit) किंवा संगीत वाद्य (Musical Instruments) जसं की गिटार, हार्मोनियम सोबत न्यायचं असेल, तर त्यासाठी सुद्धा एअरलाईन्सना आता ‘प्रवासी-अनुकूल’ धोरण ठेवावं लागणार आहे. त्यामुळे आता प्रवासात तुमचं सामान असो किंवा तुमचा लाडका पेट, कोणालाही वाऱ्यावर सोडता येणार नाहीये.

Viral Video : बी.टेक इंजिनिअरची बोलती बंद! महिना ७५ हजार कमवणाऱ्या रिक्षाचालकाची तुफान चर्चा

10 रुपयांत चहा आणि 20 रुपयांत नाश्ता

हे सगळं झालं विमान प्रवास, सीट आणि अतिरिक्त शुल्काबाबत पण, विमानतळावर पाऊलं ठेवल्याबरोबर चहा आणि पाण्याची बाटली घ्यायची म्हटलं की, अवाढव्य बिल पाहून घाम फुटायचा ना? पण, आता हे सगळं विसरा. कारण सरकारनं खास सर्वसामान्यांसाठी एअरपोर्टवर सुरू केलेल्या उडान यात्री कॅफेत तुम्हाला चहा आणि पाण्याची बाटली फक्त १० रुपयांत मिळणार आहे, आणि जर भूक लागली असेल, तर हलका नाश्ता फक्त 20 रुपयांत उपलब्ध असेल. सध्या देशातल्या अनेक एअरपोर्टवर हे कॅफे सुरू झालेत आणि लवकरच याचं जाळ अन्य एअरपोर्टवरदेखील पसरवलं जाणार आहे. तर मगा आता पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही विमानाचं तिकीट बुक कराल, तेव्हा हे नियम लक्षात ठेवा आणि तुमच्या हक्कासाठी ठणकावून सांगा. कारण आता 60 टक्के सीट्स फ्री आहेत, फॅमिली सोबतच बसणार आहे आणि 10 रुपयांत चहा सुद्धा मिळणार आहे!

Exit mobile version