Download App

Road Accident : काळाचा घाला! भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू

Road Accident : रस्ते अपघाताच्या घटना देशभरात सातत्याने (Road Accident) घडत आहेत. जास्त लोकसंख्येच्या राज्यात ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. आताही राजस्थानात असाच भीषण अपघात झाला असून या अपघातात एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. रात्री उशीरा नोरंगदेसर गावाजवळ हा अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच हनुमानगडचे पोलीस अधीक्षक आणि एसडीएम घटनास्थळी दाखल झाले. यानंतर मदतकार्य करून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर महामार्गावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. यानंतर पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व मयत एकाच कुटुंबातील होते अशी माहिती मिळत आहे.

गुजरात हादरलं : फर्निचर व्यापाऱ्याने संपूर्ण कुटुंबच संपवलं; एकाच घरात आढळले सात मृतदेह

कार आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन कारमधील सात जणांचा मृत्यू झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपघात झाला. अपघातातील मृत्यूमखीत आई, दोन मुले, दोन सुना, नातू, नातवंडे यांचा समावेश आहे. अपघातातील जखमी दोघा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच आणखी मृत्यूमुखी पडलेल्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. हा अपघात भीषण असाच होता. कारण, बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर मृत्यू झालेल्या आणि जखमी अवस्थेतील लोकांना वाहनांतून बाहेर काढण्यात यश आले. या जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रस्त्यांवर वाहनांचा वेग भरधाव असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातातही असेच घडले होते. गौरी गणपतीच्या सणासाठी कुटुंब पुण्याहून अमरावतीकडे निघाले होते. समृद्धी महामार्गावर असताना अचानक वन्यप्राणी आडवा आला. या प्राण्याचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात कार तीन वेळा पलटी झाली. कारची वेगात होती. त्यामुळे वेगातच पलटी झाली. या अपघातात कुटुंबातील महिला ठार झाली. तर अन्य तीन प्रवासी जखमी जखमी झाले. या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे.

Cash For Query : होय, हिरानंदानीला लॉगइन आयडी, पासवर्ड दिला होता; मोईत्रांनी कारणही सांगितलं

रस्त्याच्या कडेला पायी (Road Accident) जाणारी माणसेही असतात. गाव किंवा रहदारीचा परिसर आला की वाहनाचा वेग मर्यादित करणे आवश्यक असते. तसेच रस्त्याच्या कडेला कुणी आहे का हे देखील चालकांना पहावे लागते. मात्र, बऱ्याचदा याकडे दुर्लक्ष होते. अंतर लवकर पार करण्याच्या नादात अपघात घडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देण्याची आणि वाहतुकीचे नियम पाळण्याची गरज आहे.

Tags

follow us