केरळमध्ये नवा राजकीय संघर्ष सुरु होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) केरळ राज्यात मोठा धक्का बसला आहे. केरळमध्ये असलेल्या 1200 मंदिरांमध्ये संघाचं प्रात्यक्षिक आणि शाखा घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्रावणकोर देवस्वोम बोर्डाने टीडीबीने ही बंदी घातली आहे.
पत्नीच्या घरी अन् ऑफिसला जायचे नाही : मारहाण करणाऱ्या पतीला न्यायालयाचा दम; पोलिसांनाही दिल्या सूचना
यासंदर्भात त्रावणकोर देवस्वोम बोर्ड अर्थात टीडीबीने एक परिपत्रकच जारी केलं आहे. त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा आणि ड्रीलसह सर्वच कार्यक्रम मंदिरात घेण्यास बंदी घातली आहे. तसेच बोर्डाच्या निर्देशाचं पालन न झाल्यास मंदिर प्रशासनावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं परिपत्रकात म्हटलं आहे.
Demonetization : PM मोदींचा 2000 च्या नोटेला होता विरोध; माजी मुख्य सचिवांचा खळबळजनक गौप्यस्फोट
केरळमध्ये टीडीबीने याआधीही 2016 साली मंदिरामध्ये संघाकडून हत्यारांचं प्रशिक्षण देण्यास बंदी घातली होती. त्यानंतर 2021 साली एका आदेशाद्वारे मंदिर परिसराचा उपयोग मंदिरांचे कार्यक्रम आणि सणांशिवाय इतर कुठल्याही कार्यक्रमांसाठी वापर केला जाऊ नये, असे आदेश दिले होते.
Actor Ray Stevenson : अभिनेता रे स्टीव्हनसन यांचे निधन, RRR मधील भूमिका ठरली होती हिट
आरएसएसच्या शाखा अनेक मंदिरांमध्ये सुरु होत्या. तसेच त्या ठिकाणी त्यांच ड्रिलही व्हायचं. यामुळंच अशा प्रकारचं परिपत्रक काढण्यात आलं आहे. मंदिरं भाविकांसाठी असतात आणि त्यांना कुठलाही त्रास होता कामा नये, हीच बोर्डाची भूमिका असल्याचं बोर्डाचे अध्यक्ष अनंतगोपन यांनी स्पष्ट केलं आहे.
हायकोर्टाने समीर वानखेडेंना फटकारले; ‘केससंबधी व्हॉट्सअॅप चॅट प्रसिद्ध करू नका’
तसेच फक्त आरएसएससाठीच नव्हे तर इतर कोणत्याही पक्षांना इतर कोणत्याही उद्देशानं मंदिर परिसराचा वापर करता येणार नाही. तसेच बोर्डाचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, प्रशासकीय अधिकारी आणि उपसमूह अधिकाऱ्यांनाही अशा प्रकारच्या कुठल्याही कार्यक्रमांवर प्रतिबंध घालण्यासाठी योग्य पावलं उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात अहवालही सादर करण्यास सांगितलं असल्याचं टीडीबी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
https://www.youtube.com/watch?v=U4B2uwuFjpo
दरम्यान, त्रावणकोर देवस्वोम बोर्डाअंतर्गत दक्षिण भारतातील जवळपास 1200 हिंदू मंदिरं येतात. या बोर्डांतर्गत मंदिराच कामकाज पाहिलं जातं. मंदिराचं नियोजन करणारी ही एक वैधानिक स्वायत्त मंडळ आहे. याचं मंडळाने याबाबत आदेश काढले आहेत.