Demonetization : PM मोदींचा 2000 च्या नोटेला होता विरोध; माजी मुख्य सचिवांचा खळबळजनक गौप्यस्फोट
2000 Rupees Note : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दोन हजार रुपयांची नोट बाजारात आणण्याच्या बाजूने नव्हते. मात्र नोटबंदी (demonetisation)मर्यादित काळासाठी करायची असल्याने त्यांनी इच्छा नसतानाही ते मान्य केले. मोदींनी दोन हजाराची नोट गरिबांची नोट मानली नाही. या नोटेला मोठा धोका असल्याचं सांगून त्यांनी साठेबाजी वाढणार (Stockpiling will increase)असल्याचं सांगितले होतं,अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाचे तत्कालीन प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा (Nripendra Mishra)यांनी दिली आहे. पहिली नोटबंदी 8 नोव्हेंबर 2016 रोजी केली होती. मिश्रा हे स्वतः नोटपबंदीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होते.
जिल्हा बँकाकडे 112 कोटींच्या जुन्या नोटा धूळखात; आता 2000 च्या नोटा स्विकारण्याची धास्ती
रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा काढून घेण्याच्या अधिसूचनेच्या एका दिवसानंतर मिश्रा यांनी सांगितलं की, या नोटा काढण्याचा निर्णय म्हणजे नोटबंदी नाही.ही नोटबंदी नाही तर दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान मोदींच्या काळात झालेल्या पहिल्या नोटबंदीच्या वेळी दोन हजार हजार रुपयांची नोट चलनात आणण्याची सूचना करण्यात आली होती, ती पंतप्रधान मोदींना आवडली नव्हती. मात्र त्या टीमच्या सल्ल्याने त्यांनी या नोटांना परवानगी दिली होती.
ते म्हणाले की, दोन हजारांच्या नोटा चलनातून बाद केल्याने पंतप्रधानांचा मॉड्युलर बिल्डिंगचा दृष्टीकोन दिसून येतो. त्याची सुरुवात 2018-19 मध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांच्या छपाईवर बंदी घातली होती. त्यानंतर ते हळूहळू चलनाबाहेर गेले आणि आता 30 सप्टेंबर 2023 रोजी ते पूर्णपणे चलनाबाहेर जाणार आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने 19 मे रोजी दोन हजार रुपयांची नोट चलनातून काढून घेण्याची घोषणा केली आहे. दोन हजारांच्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बँकांमध्ये जमा करता येणार आहेत. पण त्यासाठी देखील एक मर्यादा घालून दिली आहे. एका वेळी फक्त 10 नोटाच बदलून घेता येणार आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सोमवारी सांगितलं की, चलनातून दोन हजार रुपयांची नोट काढून घेतल्यानं अर्थव्यवस्थेवर फारसा काही परिणाम होणार नाही, कारण या नोटा चलनात असलेल्या एकूण नोटांच्या फक्त 10.8 टक्के आहेत. ते म्हणाले की, 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजारांच्या बहुतांश नोटा परत येणे अपेक्षित आहे. मात्र त्यानंतरही ती नोट वैध राहणार आहे.