Actor Ray Stevenson : अभिनेता रे स्टीव्हनसन यांचे निधन, RRR मधील भूमिका ठरली होती हिट

Actor Ray Stevenson : अभिनेता रे स्टीव्हनसन यांचे निधन, RRR मधील भूमिका ठरली होती हिट

Ray Stevenson Death : राजामौली यांच्या RRR मध्ये खलनायकी गव्हर्नर स्कॉट बक्सनची (RRR) भूमिका करणारा आयरिश अभिनेता रे स्टीव्हनसन यांचे (Ray Stevenson) निधन झाले आहे. (S. S. Rajamouli) स्टीव्हनसन उर्फ जॉर्ज रेमंड स्टीव्हनसन हे अवघे 58 वर्षांचे होते. त्यांच्या अकस्मात मृत्यूचे कारण समजू शकले नाही. रे स्टीवेन्सन यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

रे स्टीवेन्सन हे लोकप्रिय अभिनेते असून ‘आरआरआर’ (RRR) या सिनेमाच्या माध्यमातून त्यांना देशात चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. ‘आरआरआर’ या सिनेमात रे स्टीवेन्सन खलनायकाच्या भूमिकेत दिसून आले होते. या सिनेमात त्यांनी स्कॉट बक्सटनची भूमिका साकारली होती. त्यांची ही नकारात्मक भूमिका भारतीय सिनेरसिकांच्या पसंतीस उतरली होती. रे स्टीवेन्सन यांचा ‘आरआरआर’ हा पहिलाच भारतीय सिनेमा आहे.

‘आरआरआर’ या सिनेमाचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली (S. S. Rajamouli) यांनी ट्वीट करत रे स्टीवेन्सन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ‘आरआरआर’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा रे स्टीवेन्सन यांच्यासोबतचा एक फोटो यावेळी शेअर केला आहे.

Music Director Raj : सिनेसृष्टीवर शोककळा, संगीत दिग्दर्शक राज काळाच्या पडद्याआड

या फोटोत रे स्टीवेन्सन आणि एस. एस. राजामौली सिनेमासंदर्भात चर्चा करताना दिसून आले आहेत. हा फोटो शेअर करत राजामौली यांनी लिहिले आहे की, धक्कादायक… रे स्टीवेन्सन यांचं निधन झालं आहे यावर विश्वास बसत नाही. रे स्टीवेन्सन यांचं दिलखुलास व्यक्तिमत्त्व आहे. यामुळे त्यांच्यासोबत काम करताना खूप मजा आली. पुनीशर: वॉर जोन’, ‘थॉर’ आणि ‘किल द आयरिशमॅन’ या सिनेमांच्या माध्यमातून रे स्टीवेन्सन यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube