नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2029 मध्ये भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. त्यानंतर आता हे स्वप्न लवकरच साकार होणार असल्याचे चित्र दिसू लागले असून, भारतीय अर्थव्यवस्थेचा (Indian Economy) डंका लवकरच जगभरात वाजणार असल्याचं रेटिंग एजन्सीनं म्हटलं आहे. गुरूवारी (दि.19) हा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. (S&P Global Report On indian Economy)
अजित पवारांनी तक्रार केल्याचा धनंज मुंडेंचा दावा; फडणवीसांकडून मात्र पाठराखण, काय आहे प्रकरण
रेटिंग एजन्सीाच्या अहवालात काय?
रेटिंग एजन्सी S&P Global गुरूवारी जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, भारत 2030-31 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 6.7 टक्के दराने वाढण्याची अपेक्षा असल्याचे म्हटले आहे.
सुधारणा करण्याची गरज
2030-31 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असे जरी अहवालात म्हटले असले तरी, यासाठी काही सुधारणा करण्याचीदेखील आवश्यक्यत असल्याचे रेटिंग एजन्सी S&P Global ने नमुद केले आहे.
2023-24 या आर्थिक वर्षात 8.2 टक्क्यांच्या वाढीसह खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन आणि सार्वजनिक भांडवलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी व्यवसाय व्यवहार आणि लॉजिस्टिकमध्ये सुधारणा आवश्यक असल्याचे एजन्सीने म्हटले आहे. प्रमुख उदयोन्मुख बाजार निर्देशांकांमध्ये भारताचा समावेश झाल्यापासून भारतीय सरकारी रोख्यांमध्ये विदेशी गुंतवणूक वाढली आहे. त्यात आणखी वाढ होण्याचीही अपेक्षा आहे.
पायाभूत सुविधांवर काम करण्याची गरज
भारताचा सुमारे 90 टक्के व्यापार सागरी मार्गाने होतो, वाढती निर्यात आणि मोठ्या प्रमाणात वस्तूंची आयात व्यवस्थापित करण्यासाठी मजबूत बंदर पायाभूत सुविधा आवश्यक आहेत. त्यामुळे भारताला विस्तृत किनारपट्टीच्या संदर्भात व्यापार नफा वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा आणि भू-राजकीय धोरण विकसित करणे आवश्यक आहे असेही इंडिया फॉरवर्ड: इमर्जिंग पर्स्पेक्टिव्हज’ या शीर्षकाच्या अहवालाच्या पहिल्या आवृत्तीत नमुद करण्यात आले आहे.
Tirupati Controversy : तिरुपती ‘लाडू’त चरबी! जाणून घ्या, कसा तयार केला जातो लाडू प्रसादम्..
ऊर्जेच्या वाढत्या मागणीवरही कटाश
जाहीर करण्यात आलेल्या अहवालात भारतातील उर्जेच्या वाढत्या मागणीवरही भाष्य करण्यात आले आहे. ज्यात देशांतर्गत ऊर्जेची वाढती मागणी भारतासमोरील आव्हानांवरही प्रकाश टाकण्यात आला. ऊर्जा सुरक्षा आणि एनर्जी संक्रमण योजना यांच्यातील समतोल साधण्यासाठी भारत अक्षय तंत्रज्ञान व कमी उत्सर्जन इंधन यासारख्या शाश्वत तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करू शकतो असे सांगण्यात आले आहे. याशिवाय अन्न सुरक्षा आणि आर्थिक स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी सिंचन, साठवण आणि पुरवठा वितरण यासारख्या गंभीर पायाभूत समस्यांवर लक्ष देणे आवश्यक असल्याचे S&P Global ने म्हटले आहे.