Rich Indian : दरवर्षी ‘इतके’ भारतीय कमावतात १० कोटी; आकडे ऐकून व्हाल थक्क!
Rich Indian : Centrum Institutional च्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा करण्यात आला आहे. सन २०१९ ते २०२४ पर्यंत देशात दहा कोटी रुपयांपर्यंत (Rich Indian) कमाई करणाऱ्या लोकांच्या संख्येत तब्बल ६३ टक्के इतकी वाढ नोंदविण्यात आली आहे. आजमितीस भारतात श्रीमंत आणि जास्त उत्पन्न मिळवणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. नुकत्याच एका रिपोर्टने याबाबतची आकडेवारी समोर आणली आहे. सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्चचा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. देशात ३१ हजारांपेक्षा जास्त लोक दरवर्षी १० कोटी रुपये इतकी कमाई करत आहेत. तर दरवर्षी पाच कोटी रुपये कमाई करणाऱ्या लोकांच्या संख्येने ५८ हजारांचा टप्पा पार केला आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहेत.
पाच वर्षांत छप्परफाड कमाई
संस्थेच्या अहवालात मागील पाच वर्षांची आकडेवारी देण्यात आली आहे. भारतात करोडपती लोकांची संख्या वेगाने वाढत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. २०१९ ते २०२४ या पाच वर्षांच्या काळात दहा कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या लोकांच्या संख्येत ६३ टक्क्यांपेक्षा जास्ती वाढ झाली आहे. सध्या ३१ हजार ८०० लोक दरवर्षी इतकी कमाई करत आहेत. या काळात दहा कोटींपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या लोकांची एकूण संपत्ती ३८ लाख कोटी रुपये इतकी झाली आहे. या संपत्तीत १२१ टक्क्यांची वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.
याच पद्धतीने ज्या भारतीयांचे वार्षिक उत्पन्न पाच कोटींपेक्षा जास्त आहे त्यांची संख्या मागील पाच वर्षांच्या काळात ४९ टक्क्यांनी वाढली आहे. हा आकडा ५८ हजार २०० इतका आहे. २०१९ ते २०२४ या काळात या लोकांच्या संपत्तीत १०६ टक्क्यांच्या वाढीसह ४० लाख कोटी रुपये इतकी झाली आहे.
श्रीमंताचा दिखावा पडणार महागात, IAS पूजा खेडकरांच्या अडचणीत वाढ, पुणे पोलीस करणार कारवाई
कोरोनाचाही इफेक्ट नाही
मागील पाच वर्षांच्या काळात भारतीयांच्या कमाईत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या काळात देशभरात कोरोनाचेही (Covid 19) संकट आले होते. या संकटात जगभरात अर्थव्यवस्था ठप्प पडली होती. लाखो उद्योग व्यवसाय बंद पडले. लोकांच्या उत्पन्नात कमालीची घट झाली. अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा भारतीय लोकांचे उत्पन्न वाढत गेले. आता या अहवालात असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे की सन २०२८ पर्यंत भारतातील उच्च उत्पन्न असणाऱ्या लोकांचे उत्पन्न १४ टक्के दराने वाढण्याची शक्यता आहे. असे जर घडले तर या लोकांचे उत्पन्न २.२ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे.
देशात फक्त १५ टक्के लोक असे आहेत जे त्यांच्या आर्थिक संपत्तीचे व्यवस्थापन तज्ज्ञांमार्फत करतात असे या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. जगभरात याचे प्रमाण ७५ टक्के आहे. नोकरीच्या तुलनेत लोकांनी व्यवसायाचा मार्ग (Business) धरल्याने त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.
करोडपती बनण्याचा फॉर्म्युलाही खास
करोडपती बनण्याचे प्रत्येकाचेच स्वप्न असते. पण जर योग्य स्ट्रॅटेजीनुसार पैशांची गुंतवणूक (Investment) केली तर एक कोटींचे टार्गेट गाठणे कठीण नाही. हा आकडा गाठणे आज तुम्हाला अशक्य वाटेल पण योग्य गुंतवणूक आणि कंपाऊंडिंग पॉवर असेल तर या उद्दिष्टपर्यंत पोहोचणे फार कठीण नाही. यामध्ये एक खास फॉर्म्युला नक्कीच उपयोगी पडू शकेल.
UPI मध्ये बदल, बँक खात्याशिवाय होणार पेमेंट, ‘या’ लोकांना मिळणार फायदा
फंडस् इंडिया रिसर्च रिपोर्टनुसार जर तुम्ही म्युच्युअल फंड (Mutual Fund) एसआयपीमध्ये दहा टक्के वाढीच्या दरानुसार दरमहा ३० हजार रुपयांची गुंतवणूक केली तर यावर १२ टक्के अनुमानित दरावर सात वर्षांत ५० लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकता. जर याच पद्धतीने पुढे गेलात तर यामध्ये आणखी ५० लाख रुपयांची भर पडण्यासाठी फक्त दोन वर्षे लागतील. अर्थात बाजारातील चढ उताराच्या परिस्थितीत एसआयपीवर मिळणार मोबदला कमी जास्त असू शकतो.
(टीप : कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी तुमच्या मार्केट तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)