Download App

सरपंच ते मुख्यमंत्री, जाणून घ्या ओडिशाचे नवीन मुख्यमंत्री मोहन माझी यांचा राजकीय प्रवास

Mohan Charan Majhi : ओडिशा विधानसभा निवडणुकीत (Odisha Assembly Election 2024) भाजपने (BJP) ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर

  • Written By: Last Updated:

Mohan Charan Majhi : ओडिशा विधानसभा निवडणुकीत (Odisha Assembly Election 2024) भाजपने (BJP) ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर ओडिशाचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते. तर आता भाजपने मोठा निर्णय घेत ओडिशाचे 15 वे मुख्यमंत्री म्हणून मोहन चरण माझी (Mohan Charan Majhi) यांच्या नावाची घोषणा केली आहे.

ओडिशाचे नवीन मुख्यमंत्री म्हणून मोहन चरण माझी 12 जून रोजी शपथ घेणार आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत केओंझार (Keonjhar) विधानसभा मतदारसंघातून बीजेडीचे (BJD) मीना माझी यांचा 11,577 मतांनी पराभव केला होता. मोहन चरण माझी हेमानंद बिस्वाल यांच्यानंतर ओडिशाचे दुसरे आदिवासी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. तर कनकवर्धन सिंहदेव आणि प्रभावती परिदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे.

मोहन माझी 1997-2000 दरम्यान सरपंच होते तर 2000 मध्ये केओंझर विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. ते 2000 ते 2009 दरम्यान केओंझरमधून सलग दोन वेळा विजय झाले आहे त्यानंतर याच मतदारसंघातून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मोहन माझी विजयी झाले होते तर 2024 च्या विधानसभा निवडणुकी देखील त्यांनी याच मतदारसंघातून चौथ्यांदा विजय मिळवला आहे.

माहितीनुसार, मोहन माझी कायद्याचे पदवीधर असून त्यांनी 1993 मध्ये सी.एस. कॉलेज चंपुवा येथून बी.ए केला आहे आणि 2011 मध्ये त्यांनी लॉ कॉलेजमधून एलएलबीची पदवी मिळवली आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे एकूण 1.97 कोटी रुपयांची मालमत्ता आहे तसेच 95.58 लाख रुपयांचे कर्ज देखील त्यांच्यावर आहे.

मोहन माझी यांचा शपथविधी 12 जून रोजी भुवनेश्वरमधील जनता मैदानावर सायंकाळी 5 वाजता होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित राहणार आहेत.

300 कोटींचा वाद अन् सासऱ्याची सुनियोजित हत्या, नागपूर हिट अँड रन प्रकरणात मोठं ट्विस्ट

ओडिशा विधानसभा निवडणुकीत भाजपने 147 जागांपैकी 78 जागांवर विजय मिळवला आहे तर बीजेडीला 51, काँग्रेसला 14, सीपीआयएमला 1 आणि इतरांना 3 जागा मिळाले आहे.

ताकद दाखवून देणार, पुन्हा खासदार आपलाच होणार, सुजय विखेंकडून मोठी घोषणा

follow us