मोठी बातमीः मोहन माझी ओडिशाचे नवे मुख्यमंत्री; जोडीला दोन उपमुख्यमंत्रीही

मोहनचरण माझी हे चौथ्यांदा आमदार आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल, सुरेश पुजारी आणि बैजयंत पंडा यांचेही नावे चर्चेत होती.

  • Written By: Published:
Mohan Majhi is new Odisha CM; KV Singh Deo and Pravati Parida his deputies

Odisha New CM Mohan Majhi : नवीन पटनायक (Naveen Patnaik) यांचा चोवीस वर्षांचा गड उद्धवस्त करून ओडिशामध्ये भाजप (BJP) सत्तेत आली आहे. ओडिशाचे नवे मुख्यमंत्री म्हणून मोहनचरण माझी (Mohan Majhi) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांच्या जोडीला दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. कनकवर्धन सिंहदेव आणि प्रभाती परिडा यांच्यावर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या तिघांचा आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या बुधवारी होणार आहे. मुख्यमंत्री निवडण्याची जबाबदारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath singh) यांच्यावर देण्यात आली होती. त्यांनी आज आमदारांची बैठक घेतल्यानंतर माझी यांच्या नावाची घोषणा केलीय.

मोहनचरण माझी हे चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल, सुरेश पुजारी आणि बैजयंत पंडा यांचेही नावे चर्चेत होती. भाजपला पहिल्यांदा ओडिशामध्ये बहुमत मिळाले आहे. 147 जणांच्या विधानसभेत भाजपने 78 जागा जिंकल्या आहेत. सरकार बनविण्यासाठी बहुमताचा आकडा हा 74 आहे. भाजपने चार जागा जिंकल्या आहेत. गेल्या चोवीस वर्षांपासून ओडिशाचे मुख्यमंत्री राहिलेले नवीन पटनायक यांचा पक्ष पराभूत झाला. नवीन पटनायक यांच्या बीजू जनता दल या पक्षाला केवळ 51 जागा मिळाल्या आहेत.

कोण आहेत ओडिशाचे मुख्यमंत्री ?

मोहन माझी हे संघाचे कार्यकर्ता आहेत. सरस्वती शिशू मंदिरात शिक्षक होते. त्यानंतर सरपंचपद भूषिवले होते. आता ते ओडिशाचे दुसरे आदिवासी मुख्यमंत्री आहेत. माझी हे क्झोंझर जिल्ह्यातील रायकोडा गावातील रहिवासी आहेत. त्यांनी बिजेडीच्या वाणी माझी यांच्या 11 हजार मतांनी पराभव केला आहे. त्यापूर्वी ते 2019, 2009 आणि 2000 मध्ये आमदार राहिले आहेत. 23 टक्के आदिवासी समाज असलेल्या ओडिशामधील माझी हे भाजपचे मोठा चेहरा आहे. माझी हे संथाल आदिवासी समूहातून येतात. याच समाजातून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येतात. ओडिशा राज्यात मिशनरींकडून आदिवासींचे धर्म परिवर्तनाचा मुद्दा अनेक वर्षांपासून गाजत आहेत. त्याविरोधात माझी हे लढले आहे. ओडिशाचे पहिले आदिवासी मुख्यमंत्री हेमानंद बिस्वाल हे राहिले आहे. ते काँग्रेसचे शेवटचे मुख्यमंत्री राहिले आहे. 1989 ते 1990 ते 1999 ते 2000 या कालावधीत दोन दोनदा मुख्यमंत्री झाले आहेत. 2022 मध्ये त्यांचे निधन झाले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube