सौरभ राजपूत हत्या प्रकरण, पतीच्या वाढदिवशीच मुस्कानने दिला मुलीला जन्म; DNA द्वारे होणार वडिलांची ओळख

Blue Drum Murder Case : उत्तर प्रदेशातील मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणातील आरोपी आणि सौरभ राजपूतची पत्नी मुस्कानने सोमवारी

Saurabh Rajput Murder Case

Saurabh Rajput Murder Case

Saurabh Rajput Murder Case : उत्तर प्रदेशातील मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणातील आरोपी आणि सौरभ राजपूतची पत्नी मुस्कानने सोमवारी संध्याकाळी मेरठमधील मेडिकल कॉलेजमध्ये एका बाळाला जन्म दिला आहे. याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली. आई आणि मूल दोघेही निरोगी असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. याबाबत वरिष्ठ तुरुंग अधीक्षक डॉ. वीरेश राज शर्मा यांनी माध्यमांना सांगितले की, रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास मुस्कानला प्रसूती वेदना वाढल्याने तिला मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आले. तसेच याबाबत तिच्या कुटुंबियातील सदस्यांना देखील माहिती देण्यात आली होती मात्र कुटुंबातील कोणताही सदस्य तिला रुग्णालयात भेटायला आला नाही.

डीएनए चाचणी होणार ?

तर दुसरीकडे सौरभचा मोठा भाऊ राहुल राजपूत यांना बाळाची डीएनए चाचणी (DNA Test) करण्याची मागणी केली आहे. तसेच जर अहवालात बाळ माझ्या भावाचे असल्याचे सिद्ध झाले तर आम्ही बाळाला सांभाळणार असं माध्यमांशी बोलताना राहुल राजपूत म्हणाला. तर प्रसूती विभागाच्या प्रमुख डॉ. शगुन यांनी सांगितले की, नवजात बाळाचे वजन 2.4 किलोग्रॅम होते आणि प्रसूती पूर्णपणे सामान्य झाली. आई आणि बाळ दोघेही निरोगी आहेत. रुग्णालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, मुस्कानची प्रकृती दिवसभर सामान्य राहिली आणि तिच्यावर सतत लक्ष ठेवण्यात आले.

प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता, रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराभोवती आणि वॉर्डभोवती पोलिस तैनात करण्यात आले आहे. विशेष सुरक्षा सूचना जारी करण्यात आल्या आहेत आणि वैद्यकीय (Medical College) नोंदी नियमितपणे संकलित केल्या जात आहेत.

Chiranjeev Perfect Badhalai : ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ नाटकाला रसिक प्रेक्षकांची दाद

पती सौरभची हत्या केल्याचा आरोप

मुस्कानला तिचा पती सौरभ राजपूतच्या हत्येप्रकरणी (Saurabh Rajput Murder Case) तिचा मित्र साहिलसह अटक करण्यात आली होती. अटकेच्या वेळी ती गर्भवती होती. ब्रह्मपुरी पोलिस स्टेशन परिसरातील इंदिरा नगर येथील रहिवासी मुस्कान रस्तोगीने तिचा प्रियकर साहिल शुक्लासह 3 मार्च रोजी तिचा पती सौरभ राजपूतची हत्या करण्याचा कट रचला. दोघांनी मृतदेहाचे चार तुकडे केले, ड्रममध्ये ठेवले आणि त्यात सिमेंट भरले. घटनेनंतर दोघेही हिमाचल प्रदेशात पळून गेले. नंतर, मुस्कानने तिच्या कुटुंबाला गुन्ह्याची माहिती दिली, ज्यांनी नंतर पोलिस तक्रार दाखल केली.

Exit mobile version