देशभरात उद्या UPI सेवा 45 मिनिटे बंद राहणार, खिशात अवश्य बाळगा कॅश….

SBI UPI Services : एसबीआयच्या मेंटेनन्समुळे 19 नोव्हेंबरला दुपारी 45 मिनिटे यूपीआय सेवा बंद राहणार; ग्राहकांसाठी यूपीआय लाइटचा पर्याय उपलब्ध.

News Photo   2026 11 18T180727.288

SBI UPI Services

SBI UPI Services : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या (Bank) स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 19 नोव्हेंबर 2026 रोजी एसबीआयच्या यूपीआय सेवांमध्ये काही काळ व्यत्यय येणार आहे. बँकेकडून करण्यात येणाऱ्या नियोजित देखभाल कामामुळे दुपारी 1 वाजून 15 मिनिटांपासून ते 2 वाजेपर्यंत म्हणजेच सुमारे 45 मिनिटे यूपीआयद्वारे पैसे पाठवता किंवा स्वीकारता येणार नाहीत. यासंदर्भात बँकेने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांना माहिती दिली आहे.

एसबीआयने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर पोस्ट करत या तात्पुरत्या बंदबाबत स्पष्टीकरण दिले आहे. नियोजित मेंटेनन्स अॅक्टिव्हिटीमुळे 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.15 ते 2 या वेळेत यूपीआय सेवा उपलब्ध राहणार नाहीत. मात्र, देखभालीचे काम निर्धारित वेळेच्या आधी पूर्ण होण्याची शक्यताही बँकेने व्यक्त केली आहे. त्यामुळे या कालावधीत डिजिटल पेमेंटवर अवलंबून असलेल्या ग्राहकांनी आधीच पर्यायी व्यवस्था करून ठेवणे आवश्यक आहे.

Sonia Gandhi Book : दोन लाख प्रती, 26 कोटींचं उत्पन्न; सोनियांना किती पैसे मिळणार?

या तांत्रिक कामाचा परिणाम सर्व प्रकारच्या डिजिटल पेमेंटवर होणार नाही. कारण एसबीआयने ग्राहकांना यूपीआय लाइटचा पर्याय उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. यूपीआय लाइटमध्ये ग्राहक आपल्या बँक खात्यातून पैसे वॉलेटमध्ये जमा करू शकतात आणि त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी यूपीआय पिन टाकण्याची गरज न पडता छोटे आर्थिक व्यवहार करू शकतात. त्यामुळे नियमित यूपीआय सेवा बंद असतानाही या पर्यायाचा वापर करून ग्राहकांना पेमेंट करता येईल.

रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार यूपीआय लाइटमध्ये एका व्यवहाराची कमाल मर्यादा 1,000 रुपये असून वॉलेटमध्ये एकावेळी जास्तीत जास्त 5,000 रुपये ठेवता येतात. डिसेंबर 2024 मध्ये आरबीआयने यापूर्वीच्या 500 रुपये आणि 2,000 रुपयांच्या मर्यादेत वाढ केली होती. दरम्यान, एसबीआयची यूपीआय सेवा केवळ 45 मिनिटांसाठी प्रभावित होणार असून त्यानंतर नेहमीप्रमाणे व्यवहार करता येतील. त्यामुळे 19 नोव्हेंबर रोजी दुपारी या वेळेत तातडीचे पेमेंट करायचे असल्यास ग्राहकांनी यूपीआय लाइटचा पर्याय वापरण्याची तयारी ठेवावी.

Exit mobile version