Download App

नवीन संसद, मोदींच्या हस्ते उद्घाटन अन् ‘सेंगोल’; लोकसभेच्या ३९ जागांभोवती भाजपचं राजकारण

  • Written By: Last Updated:

Sengol In New Parliament : स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर राजदंड चिन्ह सेंगोल राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आले आहे. मोदी सरकारने संसदेच्या नवीन इमारतीत सभापतींच्या खूर्चीजवळ सेंगोल स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या संसदेच्या उद्घाटनावरून एकीकडे वाद पेटलेला असताना सेंगोलवरूनही नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

9 Years of Modi Government : मोदींच्या ‘या’ 9 वक्तव्यांनी झाला होता देशभरात हंगामा

चोल राजवटीत सेंगोल खूप प्रसिद्ध होते आणि तेव्हापासून तामिळनाडूच्या लोकांशी त्याचा भावनिक संबंध आहे. संसदेत सेंगोल बसवण्यावरूनही वाद सुरू झाला आहे. संसद भवनात एका धर्माचं धार्मिक चिन्ह लावल्याने इतर धर्माच्या लोकांच्या भावना दुखावल्या जातील असे मत सपा खासदार एसटी हसन यांनी व्यक्त केले आहे. सेंगोलला राजकीय मुद्दा न बनवण्याची भाषा सरकार करत असले तरी त्याची एंट्री ज्या पद्धतीने झाली आहे, त्यामुळे राजकीय चर्चा अधिक तीव्र झाली आहे. सेंगोलच्या माध्यमातून भाजप तामिळनाडूच्या राजकारणावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे की काय? असा प्रश्न यामुळे उपस्थित केला जात आहे.

Tamil Nadu : तामिळनाडूत ‘अमूल’वरुन वाद, मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे अमित शाहांना पत्र

सेंगोल म्हणजे काय?

सेंगोल म्हणजेच राजदंड हे प्रतीक आहे. ज्यावर वरील बाजूस नंदिनी बसलेली आहे. हे संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक देखील आहे. सेंगोलचा इतिहास मौर्य आणि गुप्त राजघराण्यापासूनचा आहे, परंतु चोल राजवटीत ते सर्वाधिक लोकप्रिय झाले. चोल साम्राज्य (907 ते 1310) भारताच्या दक्षिण भागात राज्य करत होते. या राजवंशात राजेंद्र चोल (प्रथम) आणि राजराजा चोल यांसारखे तेजस्वी राजे होते. तमिळ साहित्याच्या इतिहासात चोल राजवटीला सुवर्णकाळ म्हटले जाते. चोल राजांचा राज्याभिषेक तंजोर, गंगाईकोंडाचोलापुरम, चिदंबरम आणि कांचीपुरम येथे होत असे. त्यावेळी पुरोहित चक्रवर्ती पदवीसह सेंगोल राजांच्या हवाली करत असत.

इतिहासाचा पाढा वाचत विरोधकांना डावललं! ‘सेंगोल’ ठेवून मोदीचं करणार नव्या संसदेचं उद्घाटन

चोल साम्राज्यात राजा हा सर्वोच्च न्यायिक अधिकारी होता. राजा विद्वान आणि मंत्री यांच्या मदतीने दोन प्रकारच्या शिक्षा देत असे. यामध्ये पहिली, फाशीची शिक्षा आणि दुसरी आर्थिक शिक्षा होय. यात सोन्याची नाणी आर्थिक शिक्षा म्हणून घेतली जात असे. चोल साम्राज्याची स्थापना राजा विजयलयाने केली होती. त्याने पल्लवांचा पराभव करून सत्तेवर आले. मध्ययुगीन काळ चोलांसाठी पूर्ण शक्ती आणि विकासाचा काळ होता. या काळात चोल शासकांनी दक्षिण भारत तसेच श्रीलंका काबीज केले होते. कुलोतुंग चोलनेही मजबूत राज्य स्थापन करण्यासाठी कलिंग (ओडिशा) काबीज केले. राजेंद्र चोल (तिसरा) हा या घराण्याचा शेवटचा शासक होता. चोल राजघराण्यानंतर दक्षिणेत विजयनगर साम्राज्याची स्थापना झाली आणि हळूहळू सेंगोलचा इतिहास जुना होत गेला. स्वातंत्र्याच्या वेळी सेंगोल पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आले.

96 वर्षांच्या वृद्धाची निवेदनासाठी धडपड; फडणवीसांशी बोलता बोलताच आली भोवळं अन्…

राजगोपालाचारी, नेहरू आणि सेंगोल

1946 च्या अखेरीस भारतात कधीही ब्रिटीश सत्ता संपुष्टात येऊ शकते हे निश्चित झाले होते. व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी पंडित नेहरूंकडून सत्ता हस्तांतरणाच्या प्रक्रियेची माहिती मागवली. त्यावेळी माउंटबॅटनने नेहरूंना विचारले होते की, जेव्हा ब्रिटिश सत्ता येथून निघून जाईल, तेव्हा तुम्हाला प्रतीक म्हणून काय दिले जाईल? माउंटबॅटनच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी नेहरूंनी राजगोपालाचारींची मदत घेतली.

राजगोपालाचारी हे नेहरूंच्या अंतरिम सरकारमध्ये मंत्री होते. राजगोपालाचारी यांनी खूप संशोधनानंतर नेहरूंना सेंगोलबद्दल सांगितले. करार झाल्यानंतर तिरुवदुथुराई अधिनमचे तत्कालीन प्रमुख अंबालावन देसीगर स्वामी यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली. सेंगोल झाल्यानंतर देसीगर स्वामींनी त्यांचे सहायक पुजारी कुमारस्वामी तांबीरन यांना सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिल्लीला पाठवले. 14 ऑगस्ट 1947 रोजी रात्री 11 वाजल्यानंतर तंबिरानने सेंगोल माउंटबॅटन यांना दिले. त्यानंतर माउंटबॅटनने सेंगोल पंडित नेहरूंच्या ताब्यात दिल्याचे सांगितले जाते. सध्या सेंगोल प्रयागराजच्या संग्रहालयात ठेवण्यात आले आहे. गेल्या वर्षी तामिळनाडू महोत्सवात त्याचा उल्लेख वेगाने पसरला होता, त्यानंतर केंद्र सरकार सक्रिय झाले.

 

लोकसभेच्या 39 जागा जिंकण्याची रणनीती

कर्नाटकातील पराभवानंतर भाजपने दक्षिणेतील तामिळनाडू आणि तेलंगणावर लक्ष केंद्रित केले आहे. 2024 च्या निवडणुकीत भाजपला तामिळनाडूमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. जयललिता यांच्या निधनानंतर तेथे विरोधी पक्षाची खुर्ची रिक्त झाली आहे. पक्षाची कमान अण्णामलाई यांच्याकडे आहे. अण्णामलाई यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीतून निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले होते. पंतप्रधानांनी प्रादेशिक मर्यादा ओलांडल्याचेही अण्णामलाई म्हणाल्या होत्या. भाजप तामिळनाडूबाबत अनेक रणनीतींवर काम करत असल्याचे बोलले जात आहे. अशा स्थितीत तामिळनाडूमध्ये सेंगोलला 39 जागा जिंकण्याच्या दृष्टीनेही बघितले जात आहे.

2019 मध्ये भाजपला तामिळनाडूमध्ये 39 पैकी एकही जागा जिंकता आली नाही. 2014 मध्ये कन्याकुमारीची जागा भाजपने जिंकली होती. तथापि, 2019 मध्ये तामिळनाडूमधील कोईम्बतूर, शिवगंगाई, रामनाथपुरम, कन्याकुमारी आणि थुटीकुड्डी या जागांसह भाजप 5 जागांवर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

तिथं उमेदवारापासूनच मारामारी, आम्हाला नो टेन्शन; मुख्यमंत्री बॅनरवर शिंदेचे पटोलेंना चिमटे

फक्त तामिळनाडूवरच फोकस का?
तामिळनाडूची सीमा दक्षिण भारतातील 3 राज्यांच्या सीमेला लागून आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळचा समावेश आहे. या राज्यांमध्ये लोकसभेच्या 100 जागा आहेत, त्यापैकी भाजपकडे फक्त 25 आहेत. जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूतील विरोधक पूर्णपणे कमकुवत झाले आहेत. त्यामुळे भाजपला आपली पाळेमुळे रोवण्याची ही चालून आलेली सोपी संधी आहे.

द्रविड राजकारण सुधारणार?

55 वर्षांपासून द्रविड राजकारणाने तामिळनाडूच्या सत्तेवर वर्चस्व गाजवले आहे आणि केवळ DMK आणि AIADMK हे द्रविडीयन राजकारण करणारे पक्षचं येथे सरकार स्थापन करत आहेत. सध्या एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली द्रमुकचे सरकार आहे. केंद्रातील सत्तेत द्रविडीयन पक्षही हस्तक्षेप करतात. 1998 मध्ये जयललिता यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार पाडले. 2004 आणि 2009 मध्ये करुणानिधींनी काँग्रेसला पाठिंबा देऊन सर्वांना चकित केले होते. तामिळनाडूत द्रविडीय राजकारणामुळे भाजपला तिथे मुळे रोवता आलेली नाहीत. एवढेच काय तर, अलीकडच्या काळात काँग्रेसची अवस्थाही बिकट झाली होती.

Video : पंतप्रधान मोदींच्या 9 योजनांनी बदललं देशाचं चित्र

Tags

follow us