Share Market Today : आज शेअर बाजारात आठवड्याची सुरुवात जोरदार झाली. (Share Market) बाजार उघडताच सेन्सेक्स-निफ्टीने नवा उच्चांक गाठला. निफ्टीने पहिल्यांदाच 25,900 चा टप्पा पार केला आणि सेन्सेक्सनेही पहिल्यांदा 84,800 चा टप्पा पार केला. निफ्टी बँकेत किंचित वाढ झाली.
मराठी माणसाला एका रुपयाचा बिझनेस देणार नाही; पश्चिम रेल्वेने मुजोर टीसी आशिष पांडेला पाठवलं घरी
6% ची वाढ नोंदवली
मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही तेजी दिसून आली. टाटा स्टील, एचडीएफसी लाइफ, ग्रासिम हे शेअर्स निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले. त्याच वेळी, व्होडाफोन आयडियाने सुमारे 6% ची वाढ नोंदवली. शुक्रवारी अमेरिकन बाजारात संमिश्र कल होता. वॉल स्ट्रीटवर, डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज 0.09 टक्क्यांच्या किंचित वाढीसह बंद झाला. S&P 500 निर्देशांक 0.19 टक्क्यांनी घसरला आणि तंत्रज्ञान-केंद्रित निर्देशांक Nasdaq 0.36 टक्क्यांनी घसरला.
285 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स 84,825 अंकांच्या जवळ व्यवहार करत होता. तर NSE चा निफ्टी 50 निर्देशांक सुमारे 106 अंकांच्या वाढीसह 25,898.25 अंकांच्या जवळ होता. निफ्टीने काही मिनिटांच्या व्यवहारात 25,910चे शिखरे गाठण्यात यश मिळवले.
भाजप निर्दयी पक्ष! पहिला नंबर अजित पवारांचा अन् निवडणुकीनंतर गद्दारांचा; राऊतांनी थेटच सांगितलं
जागतिक बाजारात संमिश्र कल
आज सोमवारी आशियाई बाजारात घसरण दिसून येत आहे. जपानमधील निक्की सार्वजनिक सुट्टीमुळे बंद आहे. दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.15 टक्क्यांनी घसरला आहे. हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक आज घसरणीसह सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.