तेजीचा गुरुवार! यूएस फेडच्या निर्णयानंतर सेन्सेक्स-निफ्टीत तेजी; निफ्टी 25,500 पार
Stock Market Record : अमेरिकी फेडरल रिजर्व्हने व्याजदरात 0.50 टक्क्यांची कपात करताच आज भारतीय शेअर बाजारात (Stock Market Record) तेजी दिसून आली. बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टीने सुरुवातीलाच दमदार कामगिरी केली. शेअर बाजारात निफ्टी (Share Market) नवा उच्चांक गाठण्याच्या तयारीत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Industries) शेअर्सच्या शेअर्सची घोडदौड सुरू आहे.
आजच्या दिवशी बीएसई सेन्सेक्सची (BSE Sensex) सुरुवात 410.95 अंकांच्या वाढीसह 83,359.17 च्या लेव्हलवर झाली. तसेच एनएसई निफ्टीची सुरुवात 109.50 अंकांच्या वाढीसह 25,487.05 च्या लेव्हलवर झाली. निफ्टी उच्चांक करण्यापासून फक्त 4 अंक मागे राहिला. आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये काल घसरण झाली होती. आज मात्र अमेरिकी फेडरल रिजर्व्हच्या निर्णयानंतर आयटी कंपन्यांचे शेअर्स तेजीत आले आहेत.
Share Market : भारतीय शेअर बाजारांची घसरणीसह सुरुवात; आयटी शेअर्स मोठ्या प्रमामत कोसळले
सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 29 शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. फक्त एकाच शेअरमध्ये घसरण आहे. बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) शेअर्समध्ये जबरदस्त तेजी आल्याने गुंतवणूकदार आनंदी झाले आहेत.
निफ्टी बँकेत जबरदस्त तेजी
बँक निफ्टीत 53,357 उच्चांक दिसून येत आहे आज दिवसभरात निफ्टी ऑलटाइम उच्चाकांचा आकडा पार करील अशी शक्यता व्यक्त होत आहे. बँक निफ्टीने ओपनिंग मिनिटांत 53,353.30 चा उच्चांक गाठला. बँक निफ्टीचे सगळेच शेअर्स तेजीत आहेत. एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये एक टक्क्यांची वाढ झाली आहे. एयू स्मॉल फायनान्स बँक आज बँक निफ्टीत टॉप गेनर आहे.
सध्याची परिस्थिती काय?
सध्या सेन्सेक्समध्ये 643.43 अंकांची वाढ दिसून येत आहे. या वाढीनंतर सेन्सेक्स 83,591.66 अंकांवर ट्रेड करत आहे. युनायटेड स्पिरिट्सचे शेअर आज तेजीत घोडदौड करत आहे. आंध्र प्रदेशच्या नव्या लिकर पॉलिसीला मंजुरी मिळाल्यानंतर लिकर संबंधित शेअर्समध्ये तेजी येण्याची शक्यता दिसत आहे. एनएसई निफ्टीच्या 50 पैकी 44 शेअर्सच्या किंमतीत वाढ झाली आहे. फक्त सहा शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. एनएसई निफ्टी सध्या 183.30 अंकांच्या वाढीसह 25,560.85 वर ट्रेड करत आहे.
Share Market: निवडणूक निकालांच्या ट्रेंडने शेअर बाजार हादरला, सेन्सेक्स 2300 हून अधिक अंकांनी घसरला