Reliance AGM 2024: 100 जीबी फ्री स्टोरेज, बोनस शेअर..; मुकेश अंबानींच्या दहा मोठ्या घोषणा
Reliance AGM 2024: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती अन् रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance AGM) चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी मोठी घोषणा केली आहे. अंबानी यांनी रिलायन्सच्या सर्वसाधारण सभेत (General Meeting of Reliance) Jio AI क्लाउड लॉन्च करण्याचा निर्णय जाहीर केला. यामध्ये यूजर्स त्यांचे फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट अपलोड करू शकतील. Jio AI Cloud ची ऑफर दिवाळीपासून सुरू होणार आहे. ज्यामध्ये Jio वापरकर्त्यांना 100GB फ्री क्लाउड स्टोरेज मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली.
IAS Transfer : IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या! मनिषा आव्हाळेंवर पुण्यात मोठी जबाबदारी
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 47 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची लोक आतुरतेने वाट पाहत होते. अपेक्षेप्रमाणे घोषणांचा पाऊस पडला. या बैठकीत मुकेश अंबानी यांच्यासह कंपनीचे उच्चपदस्थ अधिकारी सहभागी झाले होते.
1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स
रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक मंडळ 5 सप्टेंबर रोजी 1:1 ‘बोनस शेअर्स’ जारी करण्याचा विचार करेल. रिलायन्सने शेवटचे ‘बोनस शेअर्स’ सप्टेंबर 2017 मध्ये जारी केले होते. कंपनीच्या संचालक मंडळाची गुरुवारी बैठक होणार आहे. यामध्ये शेअरधारकांना 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स देण्याची शिफारस केली जाईल. रिलायन्सने यापूर्वी 2017 आणि 2009 मध्ये 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स जारी केले होते.
2. 100 GB विनामूल्य क्लाउड स्टोरेज
रिलायन्सने Jio AI क्लाउड ‘वेलकम ऑफर’ जाहीर केली आहे. मात्र, यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. ही ऑफर दिवाळीनंतर सुरू होणार आहे. यामध्ये, Jio वापरकर्त्यांना 100 GB मोफत क्लाउड स्टोरेज ऑफर केले जाणार आहे. यामध्ये Jio tvOS, HelloJio, Jio Home IoT सोल्यूशन, JioHome ॲप आणि Jio Phonecall AI यांचा समावेश आहे.
आता घरबसल्या बघा ‘IC 814 The Kandahar Hijack’ वेब सिरीज! या OTT वर झालाय रिलीज, जाणून घ्या सविस्तर
3. Jio ब्रेन आर्टिफिशियल इंटेलिजन्स लाँच करेल
जिओ ब्रेन लवकरच आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कनेक्टेड इंटेलिजन्स जागतिक दर्जाच्या इन्फ्रासह येईल. कंपनी ‘एआय एव्हरीव्हेअर फॉर एव्हरीवन’ या थीमवर लॉन्च करणार आहे. Jio संपूर्ण AI कव्हर करणारी टूल्स आणि प्लॅटफॉर्मचा एक व्यापक संच विकसित करत आहे. त्याला ‘जिओ ब्रेन’ म्हणतात.
4. Jio ही जगातील सर्वात मोठी मोबाईल डेटा कंपनी
रिलायन्स जिओ जगातील सर्वात मोठी मोबाईल डेटा कंपनी बनली आहे. जगातील 8 टक्के मोबाईल डेटा ट्रॅफिक एकट्या जिओच्या नेटवर्कवर चालतो. कंपनीचा ग्राहक आधार आणि डेटा वापर सातत्याने वाढत आहे.
5. जामनगरमध्ये गिगावॅट स्केल ‘एआय सक्षम डेटा सेंटर’
रिलायन्स गुजरातमधील जामनगर येथे गिगावॅट स्केलचे ‘AI सक्षम डेटा सेंटर’ स्थापन करणार आहे. हा निर्णय जागतिक डेटा सेंटर नकाशावर भारताला एक प्रमुख स्थान मिळवून देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.
6. केजी गॅस क्षेत्रात सर्वाधिक उत्पादन
केजी गॅस क्षेत्राने सर्वाधिक उत्पादन घेतले आहे. येथे 30 MMSCMD (दशलक्ष मेट्रिक घनमीटर प्रतिदिन) गॅसची निर्मिती केली जात आहे. केजी गॅस क्षेत्रात 30 एमएमएससीएमडी गॅसचे उत्पादन ही एक महत्त्वाची उपलब्धी आहे. देशाच्या ऊर्जा सुरक्षा आणि अर्थव्यवस्थेवर याचे दूरगामी परिणाम होतील.
7. तंत्रज्ञान कंपनी बनण्याच्या दिशेने रिलायन्स
रिलायन्स आता तंत्रज्ञानाचा निव्वळ उत्पादक बनला आहे. समूह एका आघाडीच्या तंत्रज्ञान कंपनीत बदलत आहे. रिलायन्स जिओने भारतीय टेलिकम्युनिकेशन मार्केटमध्ये क्रांती घडवून आणली आहे. या यशामुळे कंपनीला तंत्रज्ञान क्षेत्रातील तिच्या क्षमतेवर विश्वास निर्माण झाला आहे.
8. 10 कोटी देशांतर्गत ब्रॉडबँड ग्राहक बनवण्याचे लक्ष्य
मुकेश अंबानी यांनी एजीएममध्ये आपल्या भाषणात Jio AirFiber साठी महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले. ते म्हणाले की,100 दशलक्ष देशांतर्गत ब्रॉडबँड ग्राहक मिळवण्याचे रिलायन्स जिओचे उद्दिष्ट आहे. यातून दरमहा तीन कोटी ग्राहक जोडले जातील. मुकेश अंबानींची ही घोषणा भारत सरकारच्या डिजिटल इंडिया मिशनला बळकट करेल.
9. नोकर कपातीच्या बातम्या चुकीच्या
रिलायन्सने नोकऱ्या कपातीचे वृत्त फेटाळले आहे. कंपनीने या वृत्ताला दिशाभूल करणारे म्हटले आहे. मुकेश अंबानी यांनी स्पष्ट केले की, रिलायन्सने 2023-24 या आर्थिक वर्षात लाखो नोकऱ्या दिल्या. गेल्या वर्षी रिलायन्सने एकूण 1.7 लाख नवीन नोकऱ्या दिल्या आहेत. सध्या, रिलायन्सची एकूण कर्मचाऱ्यांची संख्या अंदाजे 6.5 लाख आहे.
10. Jio फोन कॉल AI लाँच
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी जिओ फोन कॉल AI लॉन्च केला आहे. फोन कॉल्स दरम्यान आम्ही ज्या प्रकारे संवाद साधतो त्यामध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी हे डिझाइन केल्याचं अंबानी यांनी सांगितलं.