IAS Transfer : IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या! मनिषा आव्हाळेंवर पुण्यात मोठी जबाबदारी

राज्यातील सात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीर अधिकारी मनिषा आव्हाळेंवर पुण्यात मोठी जबाबदारी सोपवण्यात आलीयं.

IPS Manisha Avhale

IAS Transfer : राज्यात पुढील काही महिन्यांत विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. निवडणुका जाहीर होण्याआधीच राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. राज्यातील एकूण 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या (IAS Transfer) करण्यात आल्या आहेत. तर सोलापुर जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी मनिषा आव्हाळे यांची पुण्यात बदली करण्यात आलीयं. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार आव्हाळे स्विकारणार आहेत. तर प्रदीपकुमार डांगे, कुलदीप जंगम, सौम्या चांडक, सतीशकुमार खडके, अभिनव गोयल, विनायक महामुनी, यांची बदली करण्यात आलीयं.

यह रिश्ता क्या कहलाता है…आपटे-राणेंच्या खांद्यावर बंदुक ठेवत अंधारेंकडून फडणवीस टार्गेट

सोलापुर जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी मनिषा आव्हाळे यांना सामान्य प्रशासन विभागाकडून बदलीसंदर्भातील पत्र पाठवण्यात आलं आहे. यामध्ये शासनाने आपली पुणे स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी या रिक्त पदावर बदली केली असल्याचं म्हटलंय. तर आव्हाळे यांचा पदभार भाप्रसे कुलदीप जंगम यांच्याकडे सोपवण्यात आल्याचंही पत्रात नमूद करण्यात आलंय.

गुजरातमध्ये पावसाचं थैमान! 30 जणांचा मृत्यू, 17 हजार लोकांचे रेस्क्यू; हवामान विभागाचा इशारा

कोणाची कुठे बदली? :
-मनिषा आव्हाळे यांची पुणे स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती
-कुलदीप जंगम यांची बुलढाणा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती
-विनायक महामुनी यांची नागपूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती
-सतीशकुमार खडके यांची बीड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती
-सौम्या शर्मा चांडक यांची नागपूर स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती
-प्रदीप कुमार डांगे यांची नवी मुंबई कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तपदी नियुक्ती

follow us