Shankaracharya Avimukteshwaranand Angry On CM Yogi Demands Resign : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ (Mahakumbh) सुरू आहे. तेथे मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सीएम योगींनी (CM Yogi) महाकुंभ चेंगराचेंगरीच्या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. यासोबतच त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती (Shankaracharya Avimukteshwaranand) संतापले आहेत.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, आमचे मुख्यमंत्री ढोंगी आहेत. त्यांनी पाप केलं आहे. एवढी मोठी घटना घडली अन् ते आमच्याशी खोटे बोलले की, काहीही झालं नाही. आम्हाला त्या मृतांसाठी प्रार्थना करण्याची संधीही दिली गेली नाही. योगी लोकांचा झालेला मृत्यू लपवत आहेत. या महाकुंभात त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केलीय.
काँग्रेस अन ठाकरेंना मोठा धक्का! माजी आमदार रवींद्र धंगेकर अन महादेव बाबर करणार शिवसेनेत प्रवेश?
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने घटनेच्या 17 तासांनंतर या मृत्यूंची पुष्टी केली. डीआयजी महाकुंभ नगर मेळा क्षेत्र वैभव कृष्णा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, कुंभ येथे झालेल्या चेंगराचेंगरीत 30 भाविकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यापैकी 25 जणांची ओळख पटली आहे. डीआयजी म्हणाले की, चेंगराचेंगरीत 90 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सर्वांना आनंद देणारा दिवस…अभिनेते रमेश देव मार्गाचा नामकरण सोहळा संपन्न
ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी प्रयागराज महाकुंभातील चेंगराचेंगरीवर मोठे वक्तव्य केलंय. चेंगराचेंगरीच्या घटनेने सरकारी व्यवस्थेचा पर्दाफाश झाल्याचं ते म्हणाले आहेत. महाकुंभात 40 कोटी भाविक आणि मौनी अमावस्येला 10 कोटी भाविक आल्याचा दावा अधिकारी आधीच करत होते. त्यानुसार त्यांनी व्यापक तयारी करायला हवी होती. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सध्याच्या सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असं म्हटलंय.
घटनेची माहिती योग्य वेळी मिळाली असती तर लोकांनी परंपरांचे पालन करून मृत आत्म्यांना श्रद्धांजली वाहिली असती, असेही ते म्हणाले. त्यांनी म्हटलंय की, हे सध्याच्या सरकारचं मोठं अपयश आहे. अशा सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. सरकारने स्वतःहून पायउतार व्हावे किंवा जबाबदार लोकांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा. या घटनेने सनातनींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय.