परदेशातून दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीची चर्चा; शरद पवारांचं केंद्रीय दुग्धमंत्र्यांना पत्र, म्हणाले…

केंद्र सरकारने दुग्धजन्य पदार्थांची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्शभूमीवर माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी केंद्रीय दुग्ध मंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. केंद्राने दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसेल. त्यामुळे दूध पदार्थ आयात करण्याचा निर्णय बाबत विचार करावा, असं पवारांनी या पत्रातून सांगितलं आहे. Today I came […]

Sharad Pawar

Sharad Pawar

केंद्र सरकारने दुग्धजन्य पदार्थांची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्शभूमीवर माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी केंद्रीय दुग्ध मंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. केंद्राने दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसेल. त्यामुळे दूध पदार्थ आयात करण्याचा निर्णय बाबत विचार करावा, असं पवारांनी या पत्रातून सांगितलं आहे.

भावी मुख्यमंत्र्यांचा बॅनर चालतो का? मुळीक व अजित पवारांमध्ये रंगला ‘पोस्टर वॉर’

शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांना एक पत्र लिहले आहे. त्या पत्रात त्यांनी लिहले आहे की आज एका वर्तमानपत्रात एक बातमी वाचायला मिळाली. ज्यामध्ये केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाचा लोणी आणि तूप यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांची आयात करण्याचा विचार असल्याचं लिहलं आहे.

दुग्धजन्य पदार्थच्या आयातीचा केंद्र सरकारचा कोणताही निर्णय पूर्णपणे अस्वीकार्य असेल, कारण या आयातीचा थेट देशांतर्गत दूध उत्पादकांच्या उत्पन्नावर परिणाम होईल. दुग्ध उत्पादक शेतकरी कोविड-19 संकटातून काही काळापूर्वीच बाहेर आले आहेत आणि अशा निर्णयामुळे डेअरी क्षेत्राच्या पुनरुज्जीवन प्रक्रियेला गंभीरपणे अडथळा निर्माण होईल. त्यामुळे याकडे लक्ष द्यावे आणि हा निर्णय रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

Maharashtra Budget : आम्ही गाजर हलवा तरी दिला त्यांनी तर फक्त गाजरं दिली होती, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

Exit mobile version