भावी मुख्यमंत्र्यांचा बॅनर चालतो का? मुळीक व अजित पवारांमध्ये रंगला ‘पोस्टर वॉर’
पुणे : भाजप नेते गिरीश बापट (Girish Bapat) यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. यानंतर पुण्यात भावी खासदार म्हणून जगदीश मुळीक (jagdish Mulik) यांचे बॅनर लागले होते. यावरून अजित पवारांनी मुळीक यांच्यावर निशाणा साधला होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे देखील भावी मुख्यमंत्री म्हणून होर्डिंग झळकले होते. आता याच मुद्द्यावरून भाजपचे मुळीक यांनी अजित पवारांना शाब्दिक टोला लगावला आहे. तुमचे बॅनर चालतात मग माझ्या बॅनरवरून राजकारण का? असा सवाल मुळीक यांनी अजित पवार यांना केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले होते. ज्येष्ठ नेत्यांच्या जाण्याने सर्वजण शोकाकुल होते. त्यांचे निधन होऊन अवघे चार दिवसही उलटले नव्हते. मात्र दुसरीकडे पुण्यातील काही अतिउत्साही कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे हा वाद खरा पेटला. या कार्यकर्त्यांनी पुणे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा वाढदिवस असल्याचे शहरभर बॅनर लावले. विशेष म्हणजे काही बॅनरवर जगदीश मुळीक यांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला. मोठं मोठे होर्डिंगवर भावी खासदार म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
माजी मुख्यमंत्र्यांनी असे आरोप करणं हे दुर्दैव; तावडेंनी व्यक्त केली खंत
अजित पवार काय म्हणाले होते?
गिरीश बापट हे पुण्याचे खासदार होते. त्यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली. या रिक्त जागेवर येत्या सहा महिन्यात पोटनिवडणूक होणार आहे. मात्र त्यांच्या निधनाला काही दिवसही झाले नाही तोच भाजपचे जगदीश मुळीक यांचे भावी खासदार म्हणून पोस्टर झळकले. यावर पवार म्हणाले, आपल्यात जरा माणुसकी राहू द्या, एवढं गुडघ्याला बाशिंग बांधायचे काही कारण नाही. आपण 13 ते 14 दिवसांचा दुखवटा पाळतो. याचं तारतम्य सगळ्यांनी ठेवावं, अशा शब्दात अजित पवार यांनी मुळीक यांना सुनावलं होत.
‘मै सब का भाई नहीं हूं…’धमकी प्रकरणावर सलमान खानचे मोठं वक्तव्य
‘पोस्टर वॉर’ वर मुळीक काय म्हणाले पाहा
अजित पवारांचे देखील भावी मुख्यमंत्री म्हणून गेल्या 20 वर्षांपासून बोर्ड लागत आहे. आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केले. असे बॅनर लागले की हे बोर्ड कार्यकर्त्यांनी लावले असे अजित पवार म्हणतात. त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या चुका दिसत नाही आणि दुसरीकडे आमच्या कार्यकर्त्यांनी असे काही केले तर त्याची शिक्षा तुम्ही दुसऱ्याला देता. असे पोस्टर लावले नाही पाहिजे होते असा मताचा मी देखील आहे, असे देखील यावेळी मुळीक यांनी स्पष्टीकरण दिले.