‘मै सब का भाई नहीं हूं…’धमकी प्रकरणावर सलमान खानचे मोठं वक्तव्य

Untitled Design   2023 04 06T135216.591

मुंबई : बॉलीवूडचा भाईजान तसेच दबंगखान म्हणून परिचित असलेला सलमान खानला (Salman Khan) गैंगस्टर लॉरेंस बिश्नोईकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. आता याच धमकी प्रकरणावर सलमानने मौन सोडले असून यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना सलमान म्हणाला ‘मैं सब का भाई नहीं हूं, किसी का भाई हूं और किसी की जान भी हूं।’ असे सलमान म्हणाला.

बॉलिवूडचा अभिनेता सलमान खानला काह दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. यातच मुसेवाला मर्डर केसमध्ये सहभाग असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने मुलाखतींमध्येही सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या धमक्यांना पाहता सलमान खान अत्यंत कडक सुरक्षेत वावरू लागला आहे. कडेकोट बंदोबस्तात सलमान काल रात्री फिल्मफेअरच्या पत्रकार परिषदेला पोहोचला.

पत्रकार परिषदेत त्याला मिळणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्यांबाबत विचारण्यात आले. मात्र, त्याने थेट उत्तर दिले नाही, पण असे काही बोलले की, त्याच्या चाहत्यांना धक्का बसेल. पत्रकार परिषदेत सलमान खानला विचारण्यात आले की, “तुम्ही संपूर्ण भारताचे भाईजान आहात, तुम्हाला धमक्या मिळतात…यावर बोलताना सलमान म्हणाला की, ‘मैं सब का भाई नहीं हूं, किसी का भाई हूं और किसी की जान भी हूं. असे म्हणतच सलमानने आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशनही केले.

धमकी…सुरक्षेत वाढ
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला जीवे मारण्याची उघड धमकी दिली होती. या गुंडाने अभिनेत्याला बिकानेरच्या मंदिरात जाऊन हरण मारल्याबद्दल माफी मागण्यास सांगितले. जर त्याने माफी मागितली नाही तर मी त्याला योग्य उत्तर देईन. मी सध्या गुंड नाही, पण सलमान खानला मारल्यावर गुंड बनेन, असेही लॉरेन्स म्हणाला. या घटनेनंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली होती.

जिथं शिवसेनेचा भगवा फडकला तिथं…; राऊतांनी इफ्तार पार्टीत केलं मोठं विधान

सलमानचे आगामी सिनेमे
सलमान लवकरच किसी का भाई किसी की जान या चित्रपटात दिसणार आहे. ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त, अभिनेता त्याच्या जासूस चित्रपट टायगर 3 मध्ये देखील खूप व्यस्त आहे.

Tags

follow us