MRF Share Price : आज भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात प्रथमच, एका समभागाने 1 लाख रुपये प्रति शेअरचा टप्पा गाठला आहे आणि तो MRF चा शेअर आहे. जगातील सर्वात महागड्या 10 स्टॉकपैकी हा एकमेव स्टॉक आहे. मद्रास रबर फॅक्टरी म्हणजेच MRF ने हा पराक्रम केला आहे आणि आज या शेअरने बाजाराच्या वेगात जोरदार झेप घेत प्रति शेअर 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
MRF स्टॉकनं मंगळवारी इतिहास घडवल्याचे बोलले जात आहे. MRF हा एक लाख रुपयांचा आकडा गाठणारा भारतातील पहिला स्टॉक ठरला आहे. बीएसईवर आज हा शेअर 99,500 वर उघडला आणि सकाळच्या सत्रातील व्यवहारात 1,00,300 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकाला स्पर्श केला. गेल्या वर्षभरात या स्टॉकमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
लोकसभेपूर्वी PM मोदींचा बेरोजगारीवर सर्जिकल स्ट्राईक: 70 हजार तरुणांना नोकरीतील नियुक्तीपत्र
परंतु, PE नुसार हा स्टॉक भारतातील सर्वात महागडा स्टॉक नसला तरी, या स्टॉकला किमतीच्या दृष्टीने सर्वात महाग स्टॉक असे बिरुद मिळाले आहे. तसेच PE च्या मते हा स्टॉक देशातील सर्वात महाग स्टॉक नाही.
Disha Patani Birthday: अवघे ५०० रुपये घेऊन मुंबईत आली अन् कोट्यवधींची मालकीण झाली!
1946 मध्ये, जेव्हा केएमएम मॅपिलाई यांनी मद्रास रबर फॅक्टरी नावाचा एक छोटासा कारखाना उभारला. त्यावेळी ही कंपनी मुलांना खेळण्यासाठी फुगे बनवायची. शेअरच्या किमतीच्या बाबतीत, MRF भारतात पहिल्या क्रमांकावर आहे ज्याचा दर 1 लाख रुपये आहे. मात्र, हनीवेल ऑटोमेशनचे शेअर्स 41152 रुपये प्रति शेअरसह या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. यानंतर, पेज इंडस्ट्रीज, श्री सिमेंट, 3एम इंडिया, अॅबॉट इंडिया, नेस्ले आणि बॉशच्या शेअर्समध्ये चांगली उंची असल्याने हे शेअर्स देशातील सर्वात महाग शेअर्सच्या यादीत आहेत.