Share Market Today : आज शेअर बाजाराची सुरुवात थोड्या वाढीसह झाली. मात्र, बाजार उघडताच बेंचमार्क निर्देशांकांनी चांगली वाढ दाखवायला सुरुवात केली. सेन्सेक्स 84,600 च्या वर 300 अंकांनी वाढला होता. (Share Market ) निफ्टीही 80 अंकांच्या वाढीसह 25,890 च्या आसपास होता. बँक निफ्टी सुमारे 230 अंकांनी वाढून 53,200 च्या वर होता. मिडकॅप निर्देशांकही वाढला. निफ्टीवर आयटी आणि पॉवर शेअर्स वधारत होते.
Video: सोनम वांगचुक पोलिसांच्या ताब्यात; राहलु गांधींचा पंतप्रधानांवर घणाघात, दिल्लीत काय घडलं?
निफ्टीला त्याच्या मोठ्या सपोर्ट लेव्हल २५,८०० चा काहीसा आधार मिळताना दिसत आहे. निफ्टीसाठी २५,८०० ची पातळी तोडली तर त्यात आणखी घसरण होऊ शकते, ज्यामुळे तो २५५०० पर्यंत जाऊ शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. तर, दुसरीकडे अपल लेव्हलकडे २६ हजारची लेव्हल आता मोठा रेझिस्टंस मानला जात आहे. सुरुवातीच्या व्यवहारात टेक महिंद्रा, एल अँड टी, महिंद्रा अँड महिंद्रा, कोल इंडिया, एसबीआय या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. तर एशियन पेंट्स, जेएसडब्ल्यू स्टील, हिंडाल्को, मारुती सुझुकी, एचयूएल यासारख्या शेअर्सवर विक्रीचा दबाव दिसून येत आहे.
बँकिंग क्षेत्रावर लक्ष
मध्यपूर्वेतील वाढता भू-राजकीय तणाव आणि जपानी बाजारातील कमकुवतपणाच्या पार्श्वभूमीवर बँकिंग, फायनान्स आणि ऑटो कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री झाल्याने सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टी तब्बल १.५ टक्क्यांनी घसरले. “गेल्या काही आठवड्यात साइडवे मूव्ह पाहिल्यानंतर नजीकच्या काळात बाजार मजबूत होईल, अशी आमची अपेक्षा आहे. या आठवड्यापासून कंपन्यांनी तिमाहीपूर्व अपडेट्स जाहीर केल्यानं क्षेत्रनिहाय आयटी आणि बँकिंग क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले जाऊ शकते अशीही शक्यता वर्तवली जात आहे.