Sandeep Thapar : शिवसेना नेते संदीप थापर (Sandeep Thapar) यांच्यावर शुक्रवारी लुधियानाच्या सिव्हिल हॉस्पिटलजवळ निहंगा वेशातील तीघांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात थापर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना लुधियानाच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये (Civil Hospital Ludhiana) नेण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांनी डीएमसी रुग्णालयात पाठवण्यात आलं.
विश्वविजेत्या टीम इंडियाला मोदींनी काय काय विचारलं? कुणी काय उत्तर दिलं?; बघा खास व्हिडिओ
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संदीप थापर हे शुक्रवारी सकाळी हे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये संवेदना ट्रस्टचे प्रमुख रविंदर अरोरा यांच्या पुण्यतिथी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आपल्या सुरक्षा रक्षकासोबत गेले होते. या कार्यक्रम आटोपून बाहेर आल्यानंतर हॉस्पिटलच्या बाहेरच त्यांच्यावर निहंग वेशातील लोकांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. संदीप थापर या हल्ल्यात संदीप गंभीर जखमी झाल्यानं ते रस्त्यावर कोसळले.
EWS, SEBC आणि OBC विद्यार्थिनींना दिलासा, मिळणार मोफत शिक्षण, सरकारचा निर्णय
ही घटना घडली त्यावेळी शेजारी अनेक लोक उभे होते. मात्र, आरोपीच्या जवळ जाण्याचे धाडस कोणीच दाखवू शकले नाही. निहंग वेशातील हल्लेखोर निघून गेल्यावर संदीप थापर यांना रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या संदीप थापर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना डीएमसी रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.
आज थापर यांच्यासोबत एक सुरक्षा रक्षकही होता, परंतु त्याने सांगितले की, निहंगांनी त्याला पकडले आणि त्याचे शस्त्र हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे तो काहीही करू शकला नाही.
या संपूर्ण प्रकरणात डीसीपी जसकिरणजीत सिंह तेजा यांनी सांगितले की,थापर यांच्यावर झालेल्या हल्याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
दरम्यान, थापर यांच्या खलिस्तानविरोधी वक्तव्यामुळे त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान त्यांनी खलिस्तानविरोधी वक्तव्य केले होते. यानंतर त्याला अनेकवेळा धमक्या देण्यात आल्या. त्यानंतर पंजाब पोलिसांनी त्यांना सुरक्षा दिली होती.