Shivaji Maharaj Bakhar : छत्रपती शिवाजी महाराजांची मोडी लिपीत असणारी जुनी अप्रकाशित बखर (Shivaji Maharaj Bakhar) फ्रान्समध्ये (France) सापडली आहे. मोडी लिपीत असणाऱ्या या बखरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्ण कारकीर्द आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या (Sambhaji Maharaj) कारकीर्दीचा प्रारंभ लिहिण्यात आला आहे.
माहितीनुसार, पुणे येथील इतिहास संशोधक गुरुप्रसाद कानिटकर (Guruprasad Kanitkar) आणि मनोज दानी (Manoj Dani) नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्समध्ये (National Library of France) काही जुनी कागदपत्र तपासत असताना त्यांना ही बखर सापडली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्ण कारकीर्द आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकीर्दीचा प्रारंभ या बखरीमध्ये देण्यात आले आहे तसेच सईबाई आणि शिवाजी महाराज यांच्यातील संवाद देखील या बखरीत देण्यात आले असल्याची माहिती इतिहास संशोधक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दानी यांनी दिली.
याच बरोबर शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं तेव्हा तिथे कोण कोण होते याचा उल्लेख देखील या बखरीत करण्यात आला असल्याची माहिती इतिहास संशोधक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दानी यांनी दिली आहे. तसेच या बखरीमध्ये शिवाजी महाराजांनी तेव्हा साधू संतांच्या भेटी घेतल्या होत्या त्याचा देखील उल्लेख या बखरीत करण्यात आला आहे. या बखरीच्या शेवटी किताबत राजश्री राघव मुकुंद यांची असा उल्लेख करण्यात आला आहे.
तसेच आत्तापर्यंत मिळालेल्या सर्व 91 कलमी बखरींचा पूर्वसुरी दस्तावेज या बखरीमध्ये असल्याची माहिती इतिहास संशोधक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दानी यांनी दिली. इतिहास संशोधक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बखर चिमाजी आप्पा यांच्या सिद्धीवरील स्वारीनंतर म्हणजे अंदाजे 1740 मध्ये लिहिण्यात आली असेल.
‘फडणवीस आम्हाला मायावी शक्तीतून बाहेर काढणार’ चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?