‘फडणवीस आम्हाला मायावी शक्तीतून बाहेर काढणार’ चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

‘फडणवीस आम्हाला मायावी शक्तीतून बाहेर काढणार’ चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

Chandrasekhar Bawankule : लोकसभा निवडणुकीत महायुतीसह (Mahayuti) भाजपला (BJP) मोठा फटका बसला आहे. या निवडणुकीत महायुतीला 48 पैकी अवघ्या 19 जागांवर विजय मिळाला असून भाजपला फक्त 9 जागा मिळाले आहे. यामुळे आज आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार पुन्हा एकदा राज्यात आण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले, आज भाजप महाराष्ट्र आणि मुंबईच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीचे उमेदवार विधानसभेत निवडून आणण्यासाठी चर्चा झाली तसेच मोदीजींच्या अभिनंदनाचा आणि विकसित भारताच्या संकल्पाबद्दल ठराव मांडण्यात आला तसेच नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार करण्यात आला असं ते म्हणाले.

बावनकुळे पुढे म्हणाले, मोदींजींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाने काम सुरू केलं आहे. आम्ही त्यांचे योजना तळागाळात पोहोचविण्यासाठी काम करणार आहे. 48 नेते 48 लोकसभेत जाणार आहे. पुन्हा एकदा जनतेला सोबत घेऊन महाराष्ट्र जिंकू असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला तसेच फडणवीसांनी आम्हाला आश्वस्त केलं की आपली संघटना महाराष्ट्रातील जनतेला मविआच्या मायावी शक्तीतून, खोट्या नरेटिव्हमधून बाहेर काढणार आहे. असं देखील ते म्हणाले.

संजय राऊत यांच्यावर टीका करताना बावनकुळे म्हणाले, संजय राऊत यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही त्यांना आम्ही महत्व देत नाही. आता खूप झालं, सकाळच्या 9 वाजेचा भोंगा जनतेने एकदा ऐकला आहे आता ऐकणार नाही. पुन्हा एकदा देवेंद्रजींच्या नेतृत्वात जनता आमच्या मागे उभं राहणार आहे. राऊतांसारख्या नेत्यांनी काहीही म्हटलं तरी फडणवीसांसारख्या सुर्यासारख्या नेतृत्वाला त्यामुळे काही फरक पडत नाही असेही बावनकुळे म्हणाले.

तर मविआच्या 38 विधानसभा जागांवर आम्ही पुढे आहोत. महाविकास आघाडीने खोटेपणाच्या बळावर जागा जिंकल्या आहे. पण खोटेपणा एकदा जिंकतो. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा सत्तेत येणार आहे आणि जनतेसाठी काम करणार आहे. राज्यातील जनता आता खोट्या नेरिटिव्हमध्ये फसणार नाही आणि पुन्हा एकदा आम्हाला महाराष्ट्रात यश मिळणार आहे असा विश्वास देखील त्यांनी वेळी व्यक्त केला.

पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन करा नाहीतर विरोधात मतदान.., ओबीसी कार्यकर्त्यांकडून भाजपला इशारा

तसेच रोहित पवार केवळ आकसापोटी आरोप करत आहे त्यांना देखील माहिती आहे की एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार लोकांसाठी काम करत आहेत. आमचं सरकार पुन्हा एकदा येणार आहे. जर आभाळ फाटलंय असं कुणी मानत असेल तर काही खरं नाही असं म्हणत त्यांनी रोहित पवारांना टोला लावला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज