Download App

रस्त्यावरचे नॉनव्हेज स्टॉल ताबडतोब बंद करा, नवनिर्वाचित भाजप आमदार अ‍ॅक्शन मोडवर

Rajstan Election 2023 :राजस्थान विधानसभा निवडणुकीत (Rajstan Election 2023) भाजपला मोठा विजय मिळाला आहे. राजस्थानात आता सरकार स्थापनेची तयारी सुरू आहे. निवडणुकीचा निकाल लागून 24 तासही उलटले नाहीत तोच नवनिर्वाचित आमदार अॅक्शन मोड आले आहेत. भाजपच्या एका आमदाराने अधिकाऱ्याला फोन करून संध्याकाळपर्यंत सर्व मांसाहारी पदार्थांचे स्टॉल रस्त्यावरून हटवण्याचा इशारा दिला आहे.

राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जयपूरच्या हवामहल मतदारसंघातून आमदार झालेल्या बालमुकुंद आचार्य यांनी रस्त्यावरुनच अधिकाऱ्याला फोन लावला आणि रस्त्यावर लावलेले मांसाहाराचे स्टॉल हटवण्याचा अल्टिमेटम दिला. त्यांचा व्हिडिओ हा व्हायरल होत आहे.

दरम्यान हवामहलचे भाजप आमदार बालमुकुंद आचार्य यांनी एका सरकारी अधिकाऱ्याला फोन करून इशारा दिला की रस्त्यावर कोणीही मांसाहार स्टॉल लावू नये. सायंकाळपर्यंत सर्व रस्ते मोकळे करावेत. मांसाहाराची विक्री करणाऱ्या अशा सर्व गाड्या हटवण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

I.N.D.I.A. च्या पराभवाचा साईड इफेक्ट; काँग्रेसचं टेन्शन वाढणार? कारण..,

त्यांनी अधिकाऱ्याला लोकांमधूनच फोन लावून विचारले की,’रस्त्यावर आपण खुलेआम मांसाहार विक्री करू शकतो का? होय किंवा नाही म्हणा. तुम्ही या विक्रीला पाठिंबा देत आहात का? संध्याकाळपर्यंत रस्त्यावर उभ्या असलेल्या आणि बांधलेल्या सर्व मांसाहारी गाड्या दिसल्या नाहीत पाहिजे. मी तुमच्याकडून संध्याकाळी अहवाल घेईन.

बालमुकुंद यांनी 600 मतांनी विजय मिळवला
रविवारी जाहीर झालेल्या निवडणूक निकालांमध्ये बालमुकुंद आचार्य यांनी राजधानी जयपूरच्या हवामहल विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर 600 मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेसचे आरआर तिवारी यांचा पराभव केला आहे.

PM मोदींच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात पैशांची उधळपट्टी? कोट्यावधीच्या हेलिपॅडवरुन कोकणात वादळ

बालमुकुंद आचार्य यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी यावर जोरदार प्रहार केला आहे. हे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. ते कोणीही रोखू शकत नाही. एखाद्याला नॉनव्हेज खाण्याचा स्टॉल लावायचा असेल तर त्याला कोणी रोखणार कसे?

Tags

follow us