Download App

विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी सोनिया गांधी मैदानात, बंगळुरूच्या बैठकीला 24 पक्ष एकवटणार

Opposition unity : 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधक भाजपविरोधात एकजूट करण्याचा प्रयत्न करत आहेत. याच अनुषंगाने 17-18 जुलै रोजी विरोधी पक्षांच्या बैठकीची दुसरी फेरी बंगळुरू येथे होणार आहे. या बैठकीत 24 पक्ष भाजपविरोधात एकत्र येण्याची शक्यता आहे. या बैठकीला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधीही उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या वर्षी भाजपशी संबंध तोडून नितीश कुमार महाआघाडीत सामील झाले होते. तेव्हापासून विरोधी पक्षांना एकत्र करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या काही महिन्यांत विविध राज्यांचा दौरा करून त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांचीही भेट घेतली होती. यानंतर 23 जून रोजी त्यांनी बिहारची राजधानी पाटणा येथे विरोधी पक्षांची मोठी बैठक बोलावली. या सर्वसाधारण सभेत 15 पक्षांचे 27 नेते सहभागी झाले होते.

यावेळी 24 पक्ष सहभागी होणार
यावेळी भाजपविरोधातील विरोधकांचा गट वाढणार असल्याचे बोलले जात आहे. एमडीएमके, केडीएमके, व्हीसीके, आरएसपी, मुस्लिम लीग, केरळ काँग्रेस (जोसेफ), केरळ काँग्रेस (मणी) हे 17-18 जुलै रोजी बंगळुरू येथे होणाऱ्या बैठकीत सहभागी होतील. अशा स्थितीत या बैठकीत एकूण 24 पक्ष सहभागी होण्याची शक्यता आहे.

कसोटी चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या पर्वाची आजपासून सुरुवात, भारत-वेस्ट इंडिज विंडसर पार्कवर भिडणार

पाटणा येथील बैठकीला हे नेते उपस्थित होते
पाटणा येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत 15 पक्षांचे 27 नेते सहभागी झाले होते. नितीश कुमार (जेडीयू), ममता बॅनर्जी (एआयटीसी), एमके स्टॅलिन (डीएमके), मल्लिकार्जुन खरगे (काँग्रेस), राहुल गांधी (काँग्रेस), अरविंद केजरीवाल (आप), हेमंत सोरेन (जेएमएम), उद्धव ठाकरे (UBT), शरद पवार (NCP), लालू प्रसाद यादव (RJD), भगवंत मान (आप), अखिलेश यादव (सपा), केसी वेणुगोपाल (काँग्रेस), सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी), मनोज झा (आरजेडी), फिरहाद हकीम (एआयटीसी), प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी), राघव चढ्ढा (आप), संजय सिंह (आप), संजय राऊत (SS-UBT), लालन सिंग (JDU), संजय झा (JDU), सीताराम येचुरी (CPIM), ओमर अब्दुल्ला (NC), टीआर बालू (DMK), मेहबूबा मुफ्ती (PDP), दीपंकर भट्टाचार्य (CPIML), तेजस्वी यादव (आरजेडी), अभिषेक बॅनर्जी (एआयटीसी), डेरेक ओब्रायन (एआयटीसी), आदित्य ठाकरे (एसएस-यूबीटी) आणि डी राजा (सीपीआय).

कुनो राष्ट्रीय उद्यानातून आणखी एका चित्ताचा मृत्यू, आतापर्यंतची सातवी दूर्घटना

आपवर सस्पेन्स
याशिवाय या बैठकीबाबत आम आदमी पक्षाचा भूमिकाही पाहण्यासारखा असेल. खरं तर, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल पाटणा येथील बैठकीला उपस्थित होते, परंतु यावेळी ते उपस्थित राहणार की नाही, यावर सस्पेन्स आहे.

Tags

follow us