कसोटी चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या पर्वाची आजपासून सुरुवात, भारत-वेस्ट इंडिज विंडसर पार्कवर भिडणार

कसोटी चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या पर्वाची आजपासून सुरुवात, भारत-वेस्ट इंडिज विंडसर पार्कवर भिडणार

IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिका आजपासून सुरू होणार आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना डॉमिनिका येथे होणार आहे. पहिला सामना 12 ते 16 जुलै दरम्यान होणार आहे. या सामन्याद्वारे भारतीय संघ 2023-25 ​​च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात करेल. चॅम्पियनशिपचा हा पहिलाच सामना असेल.

या सामन्यात टीम इंडिया अगदी वेगळ्या प्लेइंग इलेव्हनसोबत पाहायला मिळेल. यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन आणि फलंदाज यशस्वी जैस्वाल संघात पदार्पण करू शकतात. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत विकेटकीपिंगची जबाबदारी स्वीकारणाऱ्या केएस भरतने आतापर्यंतच्या फलंदाजीत निराशा केली आहे.

त्याचबरोबर स्टार वेगवान गोलंदाज मुकेश कुमारही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो. या कसोटी मालिकेसाठी अनेक मोठ्या नावांचा संघात समावेश नाही. अशा स्थितीत युवा आणि नव्या खेळाडूंना संधी मिळणार हे निश्चित मानले जात आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने काही नवीन खेळाडूंचा संघात समावेश केला आहे.

भारतात सामना कधी सुरू होणार?
12 जुलैपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणारा हा कसोटी सामना भारतीय वेळेनुसार रात्री 7.30 वाजता सुरू होईल.

कुठे होणार सामना?
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना विंडसर पार्क, रोसेओ, डॉमिनिका येथे खेळवला जाणार आहे.

टीव्हीवर लाईव्ह कुठे पाहू शकाल?
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील या कसोटी सामन्याचे भारतात दूरदर्शन (DD Sports) द्वारे टीव्हीवर थेट प्रक्षेपण केले जाईल.

केंद्राला सर्वोच्च न्यायालयाचा दणका! ईडी संचालकांना मुदत वाढ नाहीच…

सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे होणार?
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिल्या कसोटीचे लाईव्ह स्ट्रीमिंग फॅन कोड आणि जिओसिनेमा द्वारे केले जाईल.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामना
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत एकूण 98 कसोटी सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारतीय संघाने 22 आणि वेस्ट इंडिजने 30 जिंकले आहेत. त्याच वेळी, 46 कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत.

कुनो राष्ट्रीय उद्यानातून आणखी एका चित्ताचा मृत्यू, आतापर्यंतची सातवी दूर्घटना

भारताचा कसोटी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मुकेश कुमार , अक्षर पटेल, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट.

वेस्ट इंडिजचा कसोटी संघ
क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवूड (उप-कर्णधार), जोशुआ दा सिल्वा (यष्टीरक्षक), अलिक अथानेगे, रहकीम कॉर्नवॉल, शॅनन गॅब्रिएल, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, रेमन रेफर, केमार रोच, टॅगेनरीन चंद्रपॉल, कर्क मॅककेन, क्रेगेन जोमेल वॅरिकन.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube