Download App

सुरक्षा दलाची मोठी कारवाई; काश्मिरातील चकमकीत दोन अतिरेक्यांचा खात्मा

बारामूला जिल्ह्यात अतिरेकी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये धुमश्चक्री उडाली. या चकमकीत दोन अतिरेक्यांचा खात्मा केला.

Baramulla Encounter : जम्मूत एकापाठोपाठ झालेल्या हल्ल्यांनंतर दहशतवाद्यांनी (Baramulla Encounter) काश्मीर पुन्हा हादरलं. बारामूला जिल्ह्यात अतिरेकी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन अतिरेक्यांचा खात्मा केला. आज सकाळी बारामूला जिल्ह्यातील वाटरगाम भागात अतिरेकी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर या परिसराची नाकाबंदी करून शोध मोहिम सुरू करण्यात आली होती.

या मोहिमेदरम्यान अतिरेक्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे जोरदार चकमक सुरू झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अतिरेक्यांनी यावेळी हल्ल्यांचा पॅटर्न थोडा बदलला होता. काश्मीरऐवजी जम्मू भागात हल्ले केले होते.

आतंकवादी हल्ल्यांनंतर बारामूला जिल्ह्यातील हादीपोरा भागात काही संशयित आढळून आले होते. या भागात अतिरेकी लपून बसल्याची माहितीही मिळाली होती. त्यानंतर मोठ्या प्रमाणात शोध मोहिम सुरू करण्यात आली. प्रशासनाने खबरदारी घेत येथील कॉलेज बंद केले होते. याआधी सुरक्षा दलाच्या जवानांनी बांदीपोरा भागात एका अतिरेकेचा खात्मा केला होता. सर्च ऑपरेशनच्या दरम्यान अतिरेक्यांनी गोळीबार केला होता.

नाकाबंदी, सर्च ऑपरेशन अन् अतिरेक्यांचे स्केच.. जम्मूतील हल्ल्यांचा बदला घेण्यास भारत सज्ज

अतिरेक्यांकडून जम्मू टार्गेट

काश्मिरातील दहशतवादी हल्ल्यांचं लोन आता शांत असलेल्या (Terror Attack) जम्मूत येऊन पोहोचलं आहे. मागील आठवड्यात जम्मूमधील चार जिल्ह्यांत दहशतवादी हल्ल्यांच्या घटना घडल्या. सर्वात आधी रियासी येथे भाविकांच्या बसवर हल्ला झाला. यानंतर कठुआमध्ये आतंकवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यानंतर डोडा येथे दोन ठिकाणी हल्ला केला. जम्मूतील तीन जिल्ह्यांत (Jammu Terror Attack Update) चार अतिरेकी घुसले होते. यानंतर भारतीय सुरक्षा दल अलर्ट मोडमध्ये आले. या सगळ्या परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला. येथे येणाऱ्या वाहनांची तपासणी मोहिम राबवण्यात आली तसेच जंगलातही सर्च ऑपरेशन राबवण्यात आले.

दरम्यान, सर्वात आधी जम्मूतील रियासी भागात भाविकांच्या बसवर अतिरेक्यांनी हल्ला केला होता. या बसमधील भाविक माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी निघाले होते. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या अतिरेक्यांनी बसवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या गोळीबारात नऊ लोकांचा मृत्यू झाला तर तीस पेक्षा जास्त भाविक जखमी झाले होते.

जम्मू काश्मीरमधील डोडामध्ये लष्कराच्या तळावर गोळीबार; 1 दहशतवादी ठार, तीन दिवसांत तिसरी घटना

follow us

वेब स्टोरीज