जम्मू काश्मीरमधील डोडामध्ये लष्कराच्या तळावर गोळीबार; 1 दहशतवादी ठार, तीन दिवसांत तिसरी घटना
Terrorist Attack In Jammu Kashmir Doda : जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील लष्कराच्या तात्पुरत्या परिचालन तळावर (टीओबी) दहशतवाद्यांनी गोळीबार केलाय. दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला भारतीय सैन्याकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. (Terrorist Attack ) या चकमकीत भारतीय सैन्याने दिलेल्या प्रत्तुरात 1 दहशतवादी ठार झाला. (Jammu Kashmir ) तर, दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाला आहे. यासंदर्भातील माहिती जम्मू काश्मीरच्या पोलिसांकडून रात्री उशीरा देण्यात आली.
नियंत्रण सुटलं
जम्मू काश्मीरमध्ये तीन दिवसांपूर्वी रियासी जिल्ह्यात भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. दहशतवाद्यांनी भाविकांच्या एका बसवर हल्ला केला होता. यानंतर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस दरीत कोसळली. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला होता. तर, ३३ जण जखमी झाले होते. आता ही घटना ताजी असतानाच ही वरील घटना घडली आहे.
चौक्यांवरही विशेष नजर
गेल्या तीन दिवसांमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्यामुळे आता जम्मू काश्मीरसह सीमांवर सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. तसंच, पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबरोबरोच आंतरराष्ट्रीय सीमा, महामार्ग आणि पंजाब आणि हिमाचलच्या सीमेवरील चौक्यांवरही विशेष नजर ठेवण्यात आलीये.
दहशतवादी लपल्याचा संशय
जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील लष्कराच्या तात्पुरत्या परिचालन तळावर (टीओबी) दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये ३ जवान जखमी झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे. तर अद्यापही डोडामध्ये चकमक सुरू असून काही ठिकाणी दहशतवादी लपल्याचा संशय लष्कराला असून त्या पार्श्वभूमीवर शोधमोहिम सुरु आहे.