Terrorist attack : पाकिस्तान पुन्हा हादरलं, दहशतवाद्यांच्या गोळीबारात 9 जणांचा मृत्यू

Terrorist attack : पाकिस्तान पुन्हा हादरलं, दहशतवाद्यांच्या गोळीबारात 9 जणांचा मृत्यू

कराची : पाकिस्तानातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं शहर कराची या शहरात शुक्रवारी दहशतवाद्यांनी पोलीस मुख्यालयावर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांकडून देखील गोळीबार करण्यात आला. यामध्ये तहरीक ए तालिबान पाकिस्तान (टीटीपी) च्या पाच दहशतवादी आणि इतर चार लोक मारले गेले. सध्या पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांचं प्रमाण वाढलं असाताना आणखी एका दहशतवादी हल्ल्याने पाकिस्तान पुन्हा हादरलं आहे.

शुक्रवारी संध्याकाळी जवळपास 7 वाजून 10 मिनिटांनी दहशतवाद्यांनी पोलीस मुख्यालयावर हल्ला केला. तर रात्री 10 वाजून 50 मिनिटांपर्यंत ही कारवाई सुरू होती.

Nitesh Rane : इलका पण आमचा आणि धमाका पण आमचाच; नितेश राणेंनी ठाकरेंना डिवचले

कराची पोलीसचे प्रवक्त्यांनी कराची पोलीस मुख्यालयावर दहशतवाद्यांनी हल्ला झाल्याची माहिती अधिकृत केली. तर कराची पोलीस प्रमुख जावेद ओदहो यांनी ही ट्वीट करत या माहितीला दुजेरा दिला. या हल्ल्याला सुरक्षा रक्षकांनी देखील जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. चार तास चाललेल्या या कारवाईनंतर पोलीस मुख्यालयाच्या पाच मजली कार्यालायाला रिकामे करण्यात आले.

पाकिस्तान तालिबान या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या दहशतवाद्यांनी पहिले पोलीस मुख्यालयावर हल्ला केला. तर पाकिस्तान तालिबानने सरकारसोबतचा महिनाभराचा युद्धविराम संपुष्टात आणल्यानंतर नोव्हेंबरपासून पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात, वायव्य पेशावर शहरातील एका उच्च-सुरक्षा क्षेत्रातील एका मशिदीत तालिबानी आत्मघातकी बॉम्बरने स्वत:ला उडवले होते. ज्यात 100 हून अधिक लोक ठार झाले होते. मृतांमध्ये बहुतांश पोलिस होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube