Download App

राजद नेते लालू प्रसाद यादव यांचं कुंभमेळ्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, कुंभमेळा म्हणजे निव्वळ…

शनिवारी रात्री उशिरा दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १४ महिलांसह एकूण १८ जणांचा मृत्यू झाला आणि १२ हून अधिक लोक

  • Written By: Last Updated:

New Delhi Railway Station stampede : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यांनी (Railway ) कुंभमेळ्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं, तर कुंभमेळा निरुपयोगी असल्याचंही त्यांनी म्हटलं. ते म्हणाले की कुंभ म्हणजे काय? कुंभमेळा फालतू आहे.

लालू प्रसाद यादव यांनी चेंगराचेंगरीची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आणि पीडितांप्रती मी संवेदना व्यक्त करतो असं म्हटलं. त्यांनी या अपघातासाठी पूर्णपणे रेल्वेला जबाबदार धरलं आणि म्हटलं की रेल्वेच्या गैरव्यवस्थापनामुळेच इतक्या लोकांना आपला जीव गमवावा लागला. रेल्वेमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी. कुंभमेळ्याबद्दल ते म्हणाले, कुंभ मेळा फालतू आहे.

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर हाय अलर्ट; चेंगराचेंगरीतील मृतांना १० लाख, जखमींना अडीच लाखांची मदत जाहीर

शनिवारी रात्री उशिरा दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १४ महिलांसह एकूण १८ जणांचा मृत्यू झाला आणि १२ हून अधिक लोक जखमी झाले. प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती, त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत भाविकांचा मृत्यू झाला.

पोलिस उपायुक्त (रेल्वे) यांनी एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, जेव्हा प्रयागराज एक्सप्रेस ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर उभी होती, तेव्हा तिथे आधीच लोकांची मोठी गर्दी होती. अधिकाऱ्याने सांगितले की, स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस उशिराने धावत होत्या आणि या गाड्यांमधील प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक १२, १३ आणि १४ वर देखील उपस्थित होते.

“रेल्वेकडून दर तासाला सुमारे १,५०० सामान्य तिकिटे विकली जात होती, त्यामुळे स्थानकावरील गर्दी वाढली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली,” असे ते म्हणाले. प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर आणि प्लॅटफॉर्म क्रमांक १६ जवळील एस्केलेटरजवळ चेंगराचेंगरी झाली. ही घटना रात्री ९.५५ च्या सुमारास घडली, त्यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल केले.

follow us