Download App

पहिल्याचं श्रावणी सोमवारी दुर्घटना! बाराबंकी शिवमंदिरात चेंगराचेंगरी दोघांचा मृत्यू, 18 हून अधिक जखमी

Stampede in Barabanki शिवमंदिरात चेंगराचेंगरी झाली आहे. टीनच्या पत्राशेडवर विजेची तार पडल्याने ही दुर्घटना घडली आहे.

Stampede in Shivmandir due to fallen electric wire in Barabanki of UP : उत्तराखंडमधील हरिद्वार येथील (Haridwar) प्रसिद्ध मनसा देवी मंदिरात रविवारी सकाळी प्रचंड गर्दी जमल्यामुळे चेंगराचेंगरी झाली होती. ही घटना ताजी असतानाच आता पहिल्याचं श्रावणी सोमवारी उत्तर प्रदेशाच्या बाराबंकी (Barabanki) शिवमंदिरात चेंगराचेंगरी झाली आहे. टीनच्या पत्राशेडवर विजेची तार पडल्याने ही दुर्घटना घडली आहे.

कॉंग्रेसला खिंडार! कैलास गोरंट्याल यांच्यासह ‘या’ नेत्याचा भाजप प्रवेश निश्चित; रविंद्र चव्हाणांच्या उपस्थितीत होणार प्रवेश

दुर्देवाने या घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 18 हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यात जखमी असलेल्या 5 जणांची प्रकृती विजेचा धक्का बसल्याने गंभीर आहे. या घटनेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. त्यानुसार ही विजेची तार माकडांनी तोडल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे.

Rashi Bhavishya : मेष, कन्या आणि धनु राशींसाठी भाग्यशाली इतरांचं काय? जाणून घ्या सविस्तर…

या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर संवेदना व्यक्त केल्या. अधिकाऱ्यांना तात्काळ या पिडीत कुटुंबांना मदत करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच योग्य उपचार तात्काळ देण्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.

भाषणात बोलता बोलता कधी कधी घसरतो; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संग्राम जगतापांचे टोचले कान

दरम्यान या अगोदर उत्तराखंडमधील हरिद्वार येथील (Haridwar) प्रसिद्ध मनसा देवी मंदिरात रविवारी सकाळी प्रचंड गर्दी जमल्यामुळे चेंगराचेंगरी झाली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला (Mansa Devi Temple Stampede) आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. प्रशासनाचे म्हणणे आहे की, मंदिराच्या मुख्य रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय पथके तातडीने घटनास्थळी (Haridwar Mansa Devi Temple Stampede) पोहोचली. मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री धामी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलं होतं.

follow us