Steve Jobs Wife Laurene Powell : अँपलचे सीईओ स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs) यांची पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स (Laurene Powell Jobs) सध्या भारताच्या दौऱ्यावर (India Tour) आहे. नुकतंच त्यांनी वाराणसीतील (Varanasi) काशी विश्वनाथ मंदिराला (Kashi Vishwanath Mandir) भेट दिली होती. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे.
लॉरेन पॉवेल जॉब्स यांनी नुकतंच काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली मात्र त्यांना पवित्र शिवलिंगाला स्पर्श करण्याची परवानगी देण्यात आली नाही. त्यानंतर त्यांना शिवलिंगाला स्पर्श करण्यापासून का रोखण्यात आले? याबाबत सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. तर आता या प्रकरणात स्वामी कैलाशानंद गिरी महाराजांनी (Swami Kailashananda Giri Maharaj) उत्तर दिले आहे.
या प्रकरणावर भाष्य करताना गिरी महाराज म्हणाले की, लॉरेन पॉवेल जॉब्स खूप धार्मिक आहे. लॉरेन मला वडिलांप्रमाणे मानते आणि गुरु देखील मानते. तसेच त्यांच्याकडून लोकांना खूप काही शिकता येईल. संपूर्ण जगात भारतीय संस्कृती कशी प्रिय आहे याचे हे एक उदाहरण आहे. मात्र मंदिराचे काही नियम आहे, जे पाळावे लागतात. असं गिरी महाराज म्हणाले.
#WATCH | Prayagraj, UP | Laurene Powell Jobs, wife of the late Apple co-founder Steve Jobs reached Spiritual leader Swami Kailashanand Giri Ji Maharaj’s Ashram pic.twitter.com/y20yu7bDSU
— ANI (@ANI) January 12, 2025
पुढे बोलताना गिरी महाराज म्हणाले की, काशी विश्वनाथ मंदिराच्या शिवलिंगाला स्पर्श करण्यात काहीही नुकसान नाही पण मी मंदिराचा आचार्य आहे आणि येथील नियमांचे पालन करणे माझे कर्तव्य आहे. लॉरेन माझी मुलगी आहे. जेव्हा ती दर्शनासाठी आली तेव्हा महर्षी व्यासानंद देखील मंदिरात उपस्थित होते. संपूर्ण कुटुंबाने अभिषेक करून पूजा केली. लॉरेनला प्रसाद आणि जपमाळही देण्यात आली. तथापि, परंपरेनुसार, कोणताही बिगर हिंदू काशी विश्वनाथच्या शिवलिंगाला स्पर्श करू शकत नाही. जर लॉरेनने शिवलिंगाला स्पर्श केला असता, तर शतकानुशतके जुनी ही परंपरा खंडित झाली असती. असं गिरी महाराज म्हणाले.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, विष्णू चाटेच्या कोठडीत वाढ
निरंजनी आखाड्याचे स्वामी गिरी महाराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संस्कृतीत फक्त हिंदूच काशी विश्वनाथाच्या शिवलिंगाला स्पर्श करू शकतात. त्यामुळे लॉरेन पॉवेल जॉब्स यांना बाहेरून शिवलिंग पाहण्याची परवानगी देण्यात आली होती. असं गिरी महाराज म्हणाले. तसेच लॉरेन पॉवेल जॉब्स काही दिवस महाकुंभात राहणार असून गंगा नदीत स्नान करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.