Share Market : शेअर बाजारसाठी मंगळवारचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत शुभ ठरला आहे. आयटी(IT), ऑईल आणि वायू सेक्टरच्या शेअर्सची जोरदार खरेदी झाल्याने भारतीय शेअर बाजार (Indian stock market)तेजीसह बंद झाला. आज सेन्सेक्सनं (Sensex)72 हजारांचा टप्पा ओलांडला तर मिडकॅप इंडेक्सनं (Midcap Index)लाईफटाईम हाय गाठल्याचा पाहायला मिळाला. आज BSE सेन्सेक्स 455 अंकांच्या उसळीसह 72,186 अंकांवर तर NSE शेअर बाजाराचा निफ्टी 158 अंकांच्या उसळीसह 21,939 अंकांवर बंद झाला.
उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा? हिंदु-मुस्लिमांना एकसारखेच कायदे…
शेअर बाजारातील प्रचंड वाढीमुळं, लिस्टेड शेअर्सचे मार्केट कॅप देखील ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले आहे. बीएसईवर लिस्टेड कंपन्यांची मार्केट कॅप 386.97 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. सोमवारी ट्रेडिंगच्या शेवटच्या सत्रात ही मार्केट कॅप 382.74 लाख कोटी रुपये होती. याचा अर्थ आजच्या व्यवहारात गुंतवणुकदारांच्या संपत्तीत 4.23 लाख कोटी रुपयांचा मोठा फायदा झाला आहे.
Bharat Jodo Nyay Yatra : कुत्र्याच्या मालकाला बिस्किट का दिलं? राहुल गांधींनी सांगून टाकलं
आजच्या ट्रेडिंग सत्रात, आयटी शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळं त्याच्या निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. निफ्टी आयटी निर्देशांक 1085 अंकांच्या वाढीसह बंद झाला. त्याचबरोबर ऑटो, फार्मा, मेटल्स, एनर्जी, कमोडिटी, हेल्थकेअर, ऑइल आणि गॅस या कंपन्यांचे शेअर्स तेजीत बंद झाले. तर एफएमसीजी आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर् घसरल्याचे पाहायला मिळाले.
निफ्टीच्या मिडकॅप निर्देशांकानं 49000 चा ऐतिहासिक उच्चांक गाठला तर स्मॉल कॅप निर्देशांकही तेजीत दिसून आला. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 19 शेअर्स वाढीसह आणि 11 तोट्यासह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 34 शेअर्स वाढीसह बंद झाले आणि 16 तोट्यावर बंद झाले.
आजच्या ट्रेडिंग सत्रात बीपीसीएल 5.82 टक्के, एचडीएफसी लाइफ 5.23 टक्के, एचसीएल टेक 4.37 टक्के, टीसीएस 4.22 टक्के, मारुती सुझुकी 3.97 टक्के वाढीसह बंद झाले. पॉवर ग्रिड, ब्रिटानिया आयटीसी आदिंच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली.