Stock Market Today: भारत आणि पाकिस्तान यांच्यात ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) शेअर बाजार (Stock Market) कोसळला होता. मात्र, सोमवारी देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये मोठी तेजी दिसून आली. सेन्सेक्सने २००० अंकांनी वाढला. तर निफ्टीने २४,६०० अंकांचा टप्पा ओलांडला. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीच्या घोषणेनंतर ही तेजी दिसून आली. दरम्यान, या तेजीमुळे भारतीय गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला.
Apurva Nemlekar : अपूर्वा नेमळेकरचा मनमोहक अंदाज, चाहते फिदा…
सोमवारी शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. सेन्सेक्स २,०८९.३३ अंकांनी म्हणजे २.६२ टक्क्यांनी वाढून ८१,५४३.८० या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला, तर एनएसई निफ्टीमध्ये वाढ दिसून आली. निफ्टी ६६९.३ अंकांनी म्हणजे २.७८ टक्क्यांनी वाढून २४,६७७.३० वर पोहोचला आहे.
आजच्या ट्रेडिंग सत्रात अदानी एंटरप्रायझेस, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस, ट्रेंट, श्रीराम फायनान्स, अॅक्सिस बँक हे सर्वाधिक वधारलेले शेअर होते. तर सन फार्मा सर्वाधिक तोट्यात आहे.
जागतिक बाजारपेठेतही तेजी
शुक्रवारी अमेरिकन बाजारात संमिश्र व्यवहार दिसून आले. आता अमेरिका आणि चीनमधील व्यापार करारामुळे, अमेरिकन फ्युचर्समध्ये प्रॉफिट होत असल्याचे दिसून येत आहे. एस अँड पी ५०० (S&P ०.०७) टक्क्यांनी घसरला. तर डाऊ जोन्स ०.२९ टक्क्यांनी घसरला.
Apurva Nemlekar : अपूर्वा नेमळेकरचा मनमोहक अंदाज, चाहते फिदा…
शेअर बाजाराची घोडदौड सुस्साट
गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेच्या आयात कर धोरणामुळे भारतीय शेअर बाजारात नकारात्मक वातावरण दिसून आले होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. यामधून शेअर बाजार सावरत नाही तोच भारत-पाकिस्तान युद्धामुळे चिंतेचे ढग दाटले होते. या सर्वांमुळे भारतीय गुंतवणूकदार काही प्रमाणात धास्तावले होते. मात्र, आता शस्त्रसंधी झाल्यामुळे युद्धाचा तणाव निवळला. त्यामुळे शेअर बाजाराची घोडदौड पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे सूर झाल्याचं दिसतं.
तर दुसरीकडे, भारत आणि पाकिस्तानमधील युद्धामुळे सोन्याच्या किमतीतही चढ-उतार दिसून येत आहेत शस्त्रसंधी झाल्यामुळे सोन्याच्या किमती पुन्हा एकदा घसरताना दिसत आहेत.