Download App

शेअर बाजार सावरला! सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची तेजी, निफ्टीचीही घोडदौड

मंगळवारी शेअर बाजार सावरला आहे. बाजारातील व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीत तेजी दिसून आली. 

Share Market Today : सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी पडझड झाली होती. एकाच दिवसांत गुंतवणूकदारांचे तब्बल 19 लाख कोटींचे नुकसान झाले होते. त्यानंतर आज मात्र शेअर बाजार सावरला आहे. बाजारातील व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीत तेजी दिसून आली. बाजाराच्या सकाळच्या सत्रात बीएसई सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची तेजी दिसून आली. सध्या सेन्सेक्स 74,324 अंकांवर व्यवहार करत आहे. यांसह एनएसई निफ्टी जवळपास 400 अंकांच्या वाढीसह 22,540 वर ट्रेंड करत आहे.

मेटलच्या स्टॉकमध्ये सध्या खरेदीचे चित्र आहे. मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्येही चांगली तेजी दिसून येत आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे सेन्सेक्स रिकव्हरीच्या मूडमध्ये आहेत. बीएसई सेन्सेक्समध्ये Jindworld, Sequent, Vijaya, Cholahldng आणि Tdpowersys टॉप गेनर्स बनले आहेत. तसेच JSWHL, Delhivery, Welcorp, JalcorpLtd, Sardaen टॉप लूजर्सच्या यादीत आले आहेत.

ब्लॅक मंडे! 10 सेकंदात 19 लाख कोटी रुपये बुडाले, सेन्सेक्स आणि निफ्टीत 5 टक्क्यांनी घसरण

नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (National Stock Exchange) निफ्टीत Tecilchem, Keyfinserv, Shrenik, SMLT, One point टॉप गेनर्स ठरले आहेत तर Growwn 200, Abin-Ret, Msciindia, Kpc global, Mafang टॉप लूजर्स ठरले आहेत. निफ्टीत 371 अंकांच्या वाढीसह 22635 वर ट्रेंड करत आहे. अमेरिकी शेअर बाजारातून संमिश्र संकेत आहेत तर आशियाई शेअर बाजारात मात्र तेजी आहे. विदेशी बाजारांतूनही चांगले संकेत मिळत आहेत. आशियाई बाजारांत (Asian Stock Market) तेजीचा परिणाम भारतीय शेअर मार्केटवर दिसू शकतो.

सोमवारी शेअर बाजारात तुफान घसरण 

आशियाई शेअर बाजारातील तीव्र घसरणीचा परिणाम आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक उघडताच कोसळले. प्री-ओपन मार्केटमध्ये दोन्ही शेअर्समध्ये सुमारे 5 टक्क्यांच्या मोठ्या घसरणीसह व्यवहार होताना (Share Market Update) दिसले. यानंतर, जेव्हा बाजार उघडला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स (Sensex) 3000 पेक्षा जास्त अंकांच्या घसरणीसह उघडला, तर दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी (Nifty) देखील 1000 पेक्षा जास्त अंकांच्या घसरणीसह व्यवहार करू लागला. टाटा मोटर्सपासून रिलायन्सपर्यंत, सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती.

शेअर बाजारानंतर केंद्राचा सरकारने जनतेला दिला धक्का! पेट्रोल अन् डिझेल महागणार?; GR निघाला

follow us