Download App

Video : कॉलेजच्या प्राचार्यांनी भिंती गायीच्या शेणाने सारवल्या, विद्यार्थी संतापले; नेमकं काय घडलं?

Student Dispute With Principal On Cow Dung In Laxmibai College : देशात अनेक उत्तम महाविद्यालये आहेत. विशेषतः जेव्हा निवडक संस्थांचा विचार केला जातो, तेव्हा दिल्ली विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अशी नावे समोर येतात. दिल्ली (Delhi) विद्यापीठाचे चार कॅम्पस आहेत. नॉर्थ कॅम्पस, साउथ कॅम्पस, ईस्ट कॅम्पस आणि वेस्ट कॅम्पस. सध्या या विद्यापीठाशी 91 महाविद्यालये संलग्न आहेत. एनआयआरएफ रँकिंगमध्ये डीयू सहाव्या क्रमांकावर आहे. दरवर्षी डीयूमध्ये प्रवेशासाठी देशभरातून हजारो फॉर्म (Viral Video) येतात, परंतु निवडक तरुणांनाच येथे प्रवेश मिळतो. दरवर्षी हजारो विद्यार्थी प्रवेशासाठी आसुसलेल्या डीयू महाविद्यालयांमध्ये भ्रष्टाचाराचा घाणेरडा खेळ सुरू (Cow Dung) असल्याचा आरोप केला जातोय.

9 दिवसांत 3 शहरे…अपमान, मारहाण अन् धमकी; जावयासह पळून गेलेल्या सासूने सांगितली आपबिती

जिथं शिक्षणावर चर्चा व्हायला हवी तिथे, गायीच्या शेणावरून वाद सुरू आहे. हे प्रकरण डीयूच्या लक्ष्मीबाई कॉलेजमधील (Laxmibai College) आहे. तिथे भिंतीवर शेण लावण्यावरून वाद सुरू झालंय. अलिकडेच मुख्याध्यापक प्रत्युष वत्सला यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्या वर्गाच्या भिंतींवर शेण लावताना दिसत होत्या. हा व्हिडिओ (Student Dispute With Principal) समोर आल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. काही वापरकर्त्यांनी यावर मुख्याध्यापकांवर टीकाही केली, त्यानंतर मुख्याध्यापकांनी हे संशोधनाचा एक भाग असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, शेण लावून भिंती थंड ठेवता येतात.

दिल्ली विद्यापीठाच्या लक्ष्मीबाई कॉलेजच्या प्राचार्यांनी कॉलेजच्या सिमेंट प्लास्टर केलेल्या भिंतींवर गायीच्या शेणाचा लेप लावून इस्रो आणि नासाला अपयशी ठरवले. आज विश्वगुरू इंडियाचा एक टप्पा पूर्ण झाला आहे. आता दिल्ली विद्यापीठाच्या उर्वरित प्राचार्यांमधील हिंदू कधी जागे होतात हे पाहणे बाकी आहे. देशातील इतर कुलगुरू आणि प्राध्यापक त्यांच्या वर्गखोल्या आणि घरांना शेणाने लेप लावतील? असा सवाल विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष रौनक खत्री यांनी केलाय.

मुख्याध्यापकांनी शेण लावल्याचे प्रकरण सुरू असतानाच, त्यावरून विद्यार्थीही संतप्त झाले. दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष रौनक खत्री देखील प्राचार्य प्रत्युष वत्सला यांच्या कार्यालयात गाईचे शेण घेऊन पोहोचले. त्यांच्या कार्यालयाच्या भिंतींवर ते लावण्यास सुरुवात केली. यादरम्यान, उपप्राचार्य लता शर्मा यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी तिच्याशी वादही घातला.

तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब चमकणार; आजचे राशीभविष्य एका क्लिकवर…

रौनकने मुख्याध्यापकांच्या कार्यालयाच्या भिंतींवर शेण लावले. यावेळी त्यांच्यासोबत काही विद्यार्थीही उपस्थित होते. आता या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. सपा नेते अखिलेश यादव यांनीही हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया याप्रकरणी येत आहे.

शिक्षणाच्या मंदिरात हा शेणाचा खेळ सुरू आहे? यातून विद्यार्थ्यांना काय फायदा होणार आहे? मुख्याध्यापकांपासून ते डीयूएसयू अध्यक्षांपर्यंत, शिक्षण, सुव्यवस्था आणि अव्यवस्था याबद्दल बोलण्याऐवजी, ते भिंतींवर शेण लावण्यात आणि शेणावर संशोधन करण्यात व्यस्त आहेत. कॉलेज कॅम्पससाठी अशा प्रकारचे वातावरण योग्य नाही. असे करून आपण येणाऱ्या पिढीच्या किंवा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याशी खेळत आहोत, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहे.

 

follow us