Download App

Subrata Roy : ‘स्कूटरवर स्नॅक्स विकले अन् उभा केला दीड लाख कोटींचा व्यवसाय’; सुब्रतो रॉय यांचा जिद्दीचा प्रवास

Subrata Roy : सहारा इंडियाचे प्रमुख सुब्रतो रॉय (Subrata Roy) यांचे निधन झाले आहे. आजारपणामुळे त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मंगळवारी रात्री उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते 75 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. रॉय यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. त्यांच्या नेतृत्वात सहारा ग्रुपने (Sahara Group) यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली. तसेच त्यांना काही प्रसंगी तुरुंगवासही भोगावा लागला होता. रॉय यांचा जन्म 10 जून 1948 रोजी बिहार राज्यातील अररिया येथील एका सर्वसामान्य कुटुंबात झाला होता. त्यांनी उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील शासकीय तांत्रिक संस्थेतून मॅकॅनिकल इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले.

Subrato Roy: सहारा इंडियाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचे निधन

रॉय यांनी यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. त्यांच्याबाबतीत असे सांगितले जाते की रॉय यांनी लॅम्ब्रेटा स्कूटरवर बिस्कीटे आणि स्नॅक्स विक्री करत होते. त्यांनी 1978 मध्ये मित्राला सोबत घेत हा व्यवसाय सुरू केला होता. यासाठी त्यांनी दोनशे रुपयांची गुंतवणुकही केली होती. परंतु, मोठी स्वप्ने त्यांना शांत बसू देत नव्हती. त्यासाठी त्यांनी वेगळा विचार केला. एक चिटफंड कंपनी उघडून त्यांनी मित्रासोबत पॅरा बँकिंग सुरू केले. त्यावेळी 100 रुपये कमावणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या कंपनीत 20 रुपये गुंतवणूक करायला सुरुवात केली. त्यांच्या या कंपनीचा पुढे देशभरात विस्तार झाला. देशभरातील कोट्यावधी लोकांनी त्यांच्या कंपनीत गुंतवणूक केली.

सुब्रतो रॉय यांनी फक्त 36 वर्षांच्या काळात तब्बल दीड लाख कोटी रुपयांचा व्यवसाय उभा केला. सहारा इंडिया परिवाराचे चेअरमन सुब्रतो रॉय यांचा जीवनप्रवास प्रत्येकाला प्रेरणा देणारा असाच आहे. पुढे रॉय यांन फायनान्स, रिअल इस्टेट, मीडिया, हेल्थकेअर, मनोरंजन, पर्यटन यांसह अनेक क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली. इतकेच नाही तर त्यांच्या व्यवसायाचा विस्तार परदेशातही झाला. 1978 मध्ये त्यांनी सहारा ग्रुप स्थापन केला.

MP Loksabha Election : पक्की घरं, स्वस्त सिलेंडर अन् खात्यांत जमा होणार पैसे; मध्यप्रदेशच्या जनतेला भाजपची आश्वासन

सुब्रतो रॉय यांनी त्यांच्या व्यवसायाची सुरुवात सहारा बँकिंगपासून केली. यानंतर त्यांचा व्यवसाय देशभरात विस्तारला. त्यांनी अनेक क्षेत्रात गुंतवणूक केली. तसेच देशभरात अनेक ठिकाणी जमिनी खरेदी करून विकसित केल्या. कानपूर, गोरखपूर, हैदराबाद, भोपाळ, कोची, गुडगाव या ठिकाणी अनेक प्रकल्प रॉय यांनी सुरू केले. देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह परदेशात विविध ठिकाणी हॉटेल्स सुरू केली. ओदिशा, छत्तीसगड आणि झारखंड राज्यात वीज निर्मिती क्षेत्रात त्यांनी मोठी गुंतवणूक केली.

Tags

follow us