Subrato Roy: सहारा इंडियाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचे निधन

  • Written By: Published:
Subrato Roy: सहारा इंडियाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचे निधन

मुंबईः सहारा इंडियाचे प्रमुख सुब्रतो रॉय (Subrato Roy) यांचे निधन झाले आहे. आजारपणामुळे त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मंगळवारी रात्री उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. ते 75 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाबद्दल देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.त्यांचे पार्थिव लखनौमध्ये नेण्यात येणार असून, तेथे सहारा सिटीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सहारा इंडिया परिवाराचे संस्थापक व अध्यक्ष होते.सहाराश्री नावाने ते ओळखले जात होते. त्यांनी 1978 मध्ये सहारा इंडियाची स्थापना केली होती. रॉय हे मूळचे बिहारमधील अररिया जिल्ह्यातील रहिवासी होती. त्यांची शिक्षण कोलकाता येथे झाले होते. त्यानंतर उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे आले. 1978 मध्ये सुब्रत रॉयने आपल्या एका मित्राची साथीने स्कूटरवर बिस्किट विकण्यापासून व्यवसायाला सुरुवात केली होती.

एका खोलीत दोन खुर्च्या आणि एका स्कूटरवरून त्यांनी दोन लाख कोटी रुपयांचा व्यवसाय उभारला होता. त्यानंतर चिट फंड कंपनी सुरू केली होती. मध्यम वर्गीय आणि गरीब लोकांकडून पैसा जमा केला होता.

देशातील जनतेचा सहारा परिवार विश्वास होता. त्यामुळे देशभरातून सहारा चिटफंटला पैसे मिळत होते. लाखो लोकांनी पैसे गुंतविले होते. परंतु काही दिवसांनी सहारा कंपनी गुंतवणूकदारांचे पैसे परत करू शकली नाही. त्यामुळे सुब्रत रॉय यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू झाली होती.

सहारा इंडिया परिवार हे कंपनी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत होती. वित्त, बांधकाम, घर बांधणी, मीडिया, पर्यटन आणि हॉस्पिटिलीटी क्षेत्रात ही कंपनी कार्यरत होती. 2014 पर्यंत कंपनीची भरभराट झाली होती. वित्तीय अनियमिततामुळे कंपनीवर सेबीने कारवाई केली होती. त्यानंतर मात्र गुंतवणूकदारांचे पैसे सहारा इंडियात गुंतले होते. अनेक गुंतवणूकदारांना पैसे परत मिळाले नाहीत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube