Suicide Attempt Near Parliament : एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार संसदेजवळ (Parliament) एका व्यक्तीने स्वत:वर अंगावर ज्वलनशील द्वाव्य टाकून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक घटनेनंतर संसद परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती देत दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) सांगितले की, बुधवारी संसदेजवळ एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतले. आत्महत्येचा (Suicide ) प्रयत्न करताना हा माणूस गंभीर भाजला आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळावरून पेट्रोल जप्त करण्यात आले आहे. सध्या या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेबाबत पुढे दिल्ली पोलिसांनी सांगितले की, ही व्यक्ती उत्तर प्रदेशातील बागपत येथील रहिवासी आहे. जितेंद्र असे त्याचे नाव आहे. त्यांनी रेल्वे भवनाच्या चौकात स्वत:ला पेटवून घेतले. स्थानिक पोलीस आणि रेल्वे पोलिसांनी काही नागरिकांसह आग विझवली. जितेंद्रला रुग्णालयात नेण्यात आले आहे. बागपतमधील वैयक्तिक वैमनस्यातून हे प्रकरण असल्याचे दिसून येत असून, यातूनच या व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतले असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.
VIDEO | Visuals of security deployment outside the Parliament where man attempted self-immolation earlier today.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/sfpmxw48MR
— Press Trust of India (@PTI_News) December 25, 2024
ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था असताना ही घटना समोर आली आहे. गर्दीच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलिसांचे पथक सतत गस्त घालत असते.
या प्रकरणाचा तपास करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांना जितेंद्रकडून सुसाईड नोटही सापडली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
… तर मी बीड जिल्ह्याचे पालकत्व घेईन, मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
काही वृत्तानुसार जितेंद्र 90 टक्के भाजला आहे. घटनेनंतर घटनास्थळावरून समोर आलेल्या फुटेजमध्ये त्या व्यक्तीचे बूट आणि बॅग आदी सामानही आगीत जळून खाक झाल्याचे दिसत आहे. गंभीर भाजलेल्या जितेंद्रवर उपचार सुरू आहेत.