Ram Mandir theft : अयोध्येतील राम मंदिर देणगी प्रकरणात तत्काळ सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात राम मंदिर चोरी प्रकरणी सीबीआय चौकशीच्या मागणीची जनहित याचिका दाखल करण्यात आली. तत्काळ सुनावणीची गरज काय? नंतर सुनावणी झाल्यास आभाळ कोसळणार का? अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने जनहित याचिकेवर दिलीयं.
Alleged Ram Mandir donation embezzlement case | The Supreme Court has advised the petitioner seeking a CBI probe into the alleged embezzlement of donations made to the Ayodhya Ram Mandir to submit a letter before the Courts’ registry mentioning the urgency for an urgent hearing… pic.twitter.com/45ohQoilTo
— ANI (@ANI) June 29, 2026
सर्वोच्च न्यायालयासमोर राम मंदिर चोरी प्रकरणावर तत्काळ सुनावणीसाठी जनहित याचिका समोर आल्यानंतर नाराजी व्यक्त करण्यात आलीयं. जर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनंतर न्यायालयाचे नियमित कामकाज सुरु झाल्यानंतर या प्रकरणावर सुनावणी होणार असेल तर आभाळ कोसळणार नाही, या प्रकरणात एवढी घाई का? असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या बेंचसमोर तत्काळ सुनावणीची याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर 12 ते 17 जुलैदरम्यान विचार होणार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलंय.
अनंत अंबानींनी तिरुपती बालाजी चरणी केसार्पण केलं; रिलायन्स ग्रुपकडून केली मोठी घोषणा
राम मंदिर चोरी प्रकरणी दोन वकिलांनी याचिका दाखल केली होती. या जनहित याचिकेत राम मंदिर चोरी प्रकरणी सीबीआयची मागणी करण्यात आली. उत्तर प्रदेश पोलिसांकडून सुरु असलेल्या तपासावर विश्वास नसून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. उत्तर प्रदेश पोलिसांकडे पुरावे सुरक्षि राहतील याची शाश्वती नाही, असा उल्लेख याचिकेत करण्यात आला होता.
दरम्यान, राम मंदिरातील देणग्या, अर्पण आणि इतर आर्थिक व्यवहारांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी पोलिसांकडे औपचारीक तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवत तापास सुरू केला. तपासादरम्यान अविनाश शुक्ला, अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, मनीष कुमार यादव, करुणेश पांडे, रामशंकर मिश्रा, सुभाष श्रीवास्तव आणि रामशंकर यादव उर्फ टिन्नू या आठ जणांची नावे समोर आली. त्यानंतर पोलिसांनी या सर्व आरोपींना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. तपासातून आणखी काही आर्थिक व्यवहार आणि संबंधित व्यक्ती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत म्हणून त्यांचे पंख छाटण्याचे काम भाजपमध्ये सुरु; ठाकरेंचा मोठा दावा
अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातून आणि परदेशातून देखील मोठ्या प्रमाणात देणग्या जमा झाल्या होत्या. मंदिराच्या भूमिपूजनापासून ते प्राणप्रतिष्ठेपर्यंत लाखो-कोट्यवधी भाविकांनी आर्थिक योगदान दिले. मंदिर सुरू झाल्यानंतर देखील दररोज मोठ्या प्रमाणात देणग्या आणि अर्पण जमा होत आहेत. त्यामुळे या निधीच्या व्यवस्थापनाबाबत पारदर्शकता आणि विश्वास टिकवणे ट्रस्टसाठी अत्यंत महत्वाचे मानले जात होते.
