Download App

क्रेडिट कार्ड युजर्सला SC चा मोठा झटका; उशीरा बिल भरणाऱ्यांना द्यावे लागणार 50 टक्के व्याज

सर्वोच्च न्यायालयाने 2008 च्या राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाचा (NCDRC) क्रेडिट कार्डच्या विलंब शुल्काबाबतचा निर्णय रद्द केला आहे.

  • Written By: Last Updated:

Supreme Court removes 30% interest cap on late credit card bill payments : क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक धक्काधायक बातमी समोर आली असून, क्रेडिट कार्डचे (Credit Card) बिल उशिरा भरल्यास त्यावर 36 ते 50 टक्के व्याज भरावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) 20 डिसेंबर रोजी या संदर्भात आदेश जारी केला असून न्यायमूर्ती बेला त्रिवेदी आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने 2008 च्या राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाचा (NCDRC) क्रेडिट कार्डच्या विलंब शुल्काबाबतचा निर्णय रद्द केला आहे. ज्यामध्ये क्रेडिट कार्डच्या उशीरा पेमेंट शुल्क म्हणून जास्तीत जास्त 30 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बँका आता क्रेडिट कार्डच्या विलंब शुल्कावर 30 टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजेच 36-50 टक्के व्याज आकारू शकणार आहेत.

राम शिंदेंना सभापती पद देऊन फडणवीसांनी काय साधलं? जाणून घ्याच!

काय आहे संपूर्ण प्रकरण?

NCDRC ने 7 जुलै 2008 रोजी या प्रकरणी निर्णय दिला होता की जे ग्राहक देय तारखेपर्यंत संपूर्ण क्रेडिट कार्ड बिल भरत नाहीत त्यांच्याकडून 30 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज आकारले जाऊ शकत नाही. त्यानंतर एचएसबीसी, सिटी बँक आणि स्टँडर्ड चार्ज बँक यासारख्या अनेक बँकांनी या निर्णयाविरोधात अर्ज दाखल केला होता आणि आता 20 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने बँकांच्या बाजूने निर्णय दिला आहे.

NCDRC ने 2008 मध्ये आपल्या एका निर्णयात म्हटले होते की, क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांकडून 36 ते 50 टक्के वार्षिक व्याज आकारणे खूप जास्त असल्याचे म्हणत लेट पेमेंट फीसाठी व्याज मर्यादा 30 टक्के निश्चित केली. मात्र, NCDRC च्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने बँकांना दिलासा मिळाला आहे.

http://तीन दिवस सुट्टी घ्या, पण पोरं जन्माला घाला; ‘लोकसंख्या’ वाढीसाठी अजब-गजब निर्णय!

कोणते ग्राहक प्रभावित होतील?

क्रेडिट कार्ड बिल भरण्यास उशीर करणाऱ्या ग्राहकांसाठी हा मोठा धक्का आहे. कारण आतापासून, बँका अशा ग्राहकांकडून लेट बिल फी म्हणून ग्राहकांकडून 36-50 टक्के व्याज आकारू शकतात. त्यामुळे येथून पुढे अतिरिक्त व्याजाची रक्कम वाचवण्यासाठी ग्राहकांना क्रेडिट कार्डचे पेमेंट वेळेपूर्वीच भरणे फायदेशीर ठरणार आहे.

follow us