Download App

‘मियाँ’ शब्द चुकीचा… सुप्रीम कोर्ट नेमकं काय म्हटलं? वाचा सविस्तर…

Supreme Court On Miyan Tiyan Pakistani Word : चित्रपटातील गाणी (Bollywood Songs) असोत, कविता असो किंवा सामान्य बोलीभाषा… आपण ‘मियाँ’ हा शब्द अनेक वेळा ऐकलाय. पण आता हा शब्द सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाला ‘मियाँ’ हा शब्द चुकीचा नाही, असा आदेश द्यावा लागलाय. न्यायालयाने (Supreme Court) एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान म्हटलंय की, एखाद्याला ‘मियाँ तियाँ’ असं संबोधणे हा गुन्हा नाही आणि धार्मिक भावना दुखावण्याचाही तो प्रकार दिसत नाही. नेमकं प्रकरण काय होतं, ते आपण सविस्तर पाहू या…

हे संपूर्ण प्रकरण काय होते?
या प्रकरणात चास उपविभाग कार्यालयातील उर्दू अनुवादक आणि कार्यवाहक लिपिक यांनी एफआयआर दाखल केला होता. तक्रारदाराने आरोप केलाय की, जेव्हा तो माहिती अधिकार अर्जाबाबत माहिती देण्यासाठी (Miyan Tiyan Pakistani Word) गेला, तेव्हा आरोपीने त्याच्या धर्माचा उल्लेख करून त्याच्याशी गैरवर्तन केलं.

धनंजय मुंडेंनी माझ्यावर आवाज वाढवला होता; ‘त्या’ भेटीचा उल्लेख करत धसांनी काय सांगितलं?

हे प्रकरण झारखंड उच्च न्यायालयात पोहोचलं होतं. उच्च न्यायालयाने आरोपीला दोषमुक्त करण्यास नकार दिलाय. याचा अर्थ उच्च न्यायालयाच्या दृष्टीने हा गुन्हा होता. आता सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय की, एखाद्या व्यक्तीला मियां-तियां आणि पाकिस्तानी म्हणणे नक्कीच चुकीचंआहे, परंतु कायद्यानुसार त्याच्या धार्मिक भावना दुखावणे हा गुन्हा ठरणार नाही. या प्रकरणातील आरोपी व्यक्तीला भारतीय दंड संहितेच्या कलम 298 अंतर्गत दोषी मानण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय.

न्यायालयाने मियां शब्दाचे शिष्टाचार स्वीकारले आहेत. भारत देशात मुस्लिम समुदायातील लोकांना अनेक वर्षांपासून मियां भाई म्हणून संबोधतात. खरं तर मियां हा शब्द सामान्य वर्तनाचा एक भाग आहे. जिथे जिथे हिंदुस्तानी भाषा मोठ्या प्रमाणात वापरली जाते, तिथे लोक एकमेकांना अगदी सहजपणे मियां म्हणून संबोधतात. हिंदू आपल्या मुस्लिम प्रियजनांना मियां म्हणून हाक मारतात आणि मुस्लिमही आपल्या प्रिय हिंदू भावांना प्रेमाने मियां म्हणून हाक मारतात. मियाँ म्हणजे मित्र. मियां हा शब्द हळूहळू फक्त मुस्लिम समुदायातील लोकांसाठी समानार्थी बनत गेला. अलीकडे मियां म्हणजे फक्त मुस्लिम असं आपल्याला वाटतं. पण मियाँ या शब्दाचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे. म्हणूनच चित्रपट आणि साहित्याच्या जगात हा शब्द फक्त मैत्री आणि नातेसंबंधांच्या संदर्भात वापरला गेलाय.

सोनम ए कपूर आणि आनंद एस अहूजा यांचा भाने ग्रुप भारतात घेऊन आला लक्झरी कार केअर ब्रँड टोपाझ डिटेलिंग

चित्रपट गाण्यांमध्ये मियाँ या शब्दाचा अर्थ
मियाँ हा शब्द ऐकताच अनेक चित्रपटगीते आठवतात. 1967 च्या ‘शागिर्द’ चित्रपटात मोहम्मद रफी यांनी गायलेले आणि जॉय मुखर्जींवर चित्रित केलेले अनेक गाणे आहेत. ‘बडे मियाँ दीवाने, ऐसे ना बानो, हसीना क्या चाहें – सुनो हमसे’ हे गाणे मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिले होते. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केले होते. या चित्रपटात अभिनेता जॉय मुखर्जीसोबत सायरा बानो देखील होत्या. जॉनी वॉकर, मेहमूद, असरानी आणि अगदी अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्या संवादांमध्ये मियां हा शब्द मोठ्या प्रमाणात वापरला/. अमिताभ बच्चन-गोविंदा यांच्या चित्रपटाचे शीर्षक बडे मियाँ, छोटे मियाँ होते. ज्याच्या गाण्यात एक ओळ आहे – ‘बडे मियां तो बडे मियां छोटे मियां सुभानअल्लाह…’

जर मियाँ म्हणणे चुकीचे किंवा बेकायदेशीर असेल, तर सेन्सॉर बोर्ड अशा गाण्यांना कसे प्रदर्शित करेल? ऐंशीच्या दशकात अनेक लोकप्रिय चित्रपट आले. जेव्हा मियाँ या शब्दासह अनेक गाणी लिहिली गेली आणि लोकप्रिय झाली. मिथुन चक्रवर्तीवर चित्रित केलेले ‘आजा आजा मेरे मिठू मियाँ…’ अभिनेता जॅकी श्रॉफ आणि श्रीदेवीवर चित्रित केलेले ‘हां मुझे प्यार हुआ प्यार हुआ अल्लाह मियाँ…’ अशी गाणी का लिहिली गेली? ही गाणी सर्वांच्या ओठांवर लोकप्रिय झाली? नंतर, मियां भाई नावाचा एक अल्बमही खूप लोकप्रिय झाला होता.

कवितेत मियाँ या शब्दाचा वापर
मियां हा शब्द कधीही अपमानास्पद नव्हता. कवितेचे काही नमुने पहा. प्रसिद्ध कवी मुनव्वर राणा यांनीही या शब्दासह कविता लिहिली आहे.

 

follow us